Published On : Thu, Jul 25th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील वॉकर्स ऑफिसर्स क्लबच्या लॉनमध्ये धामण सापांची जोडी दिसल्याने खळबळ!

Advertisement

नागपूर: सापाच्या नावाने अनेकांची घाबरगुंडी उडते. आता चक्क नागपुरातील वॉकर्स ऑफिसर्स क्लबच्या लॉनमध्ये धामण सापांची जोडी दिसल्याने खळबळ उडाली आहे. या सापांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

क्लबच्या लॉनमध्ये धामण सापाची जोडी दिसल्यानंतर स्थानिकांनी यासंदर्भातील माहिती वन्यजीव बचावकर्ते शुभम जीआर यांना दिली. शुभम यांनी घटनास्थळी पोहोचून धामण सापांच्या जोडीला पकडून जंगलात सोडले.

दरम्यान मानवी आवारात सर्वाधिक आढळणाऱ्या सापांपैकी धामण साप एक आहे. हा आपल्या भक्ष्याला म्हणजे उंदरांना गुदमरून मारतो. या सापाला इंडियन रॅट स्नेकही म्हणतात.

हा एक मोठ्या आकाराचा साप आहे जो 11 फूट आणि 9 इंच पर्यंत वाढू शकतो .परंतु सामान्यतः 150-240 सेमी (8-8 फूट) लांबीचा साप पाहिला गेला आहे. धामण सापाच्या अंडीतून अंदाजे 30-47 सेमी पिल्ले निघतात.

Advertisement

 

View this post on Instagram

 

A post shared by Nagpur Today News (@nagpur_today)

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.