Published On : Wed, Jul 6th, 2022
By Nagpur Today Nagpur News

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बाबासाहेबांना अभिवादन

Advertisement

– प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले स्वागत

नागपूर : जनादेश मिळूनही पक्षादेश पाळणारा योद्धा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे मंगळवारी ५ जुलै रोजी नागपुरात आगमन झाले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम विमानतळ परिसरात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपा प्रदेश सचिव तथा प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी निळा दुपट्टा गळ्यात टाकून त्यांचे स्वागत केले. संपूर्ण परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयजयकार झाला.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोकभाऊ मेंढे, माजी आमदार डॉ. मिलींद माने, संदीप जाधव, सतीश शिरसवान, शंकरराव मेश्राम, रवींद्र डोंगरे, जगदीश बमनेट, योगेश पाचपोर, वत्सला मेश्राम, अंतकला मनोहरे, रोहीत बढेल व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो कॅप्शन : ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात स्वागत करताना भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम व अन्य.

Advertisement
Advertisement