Published On : Sun, Aug 9th, 2020

कामठी पंचायत समिती चे उपसभापती आढळले कोरोना पॉजिटिव्ह

कामठी तालुक्यात 3 मृत्यूसह 35 रुग्ण कोरोना पॉजिटिव्ह

कामठी :-कामठी तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला असून आज कामठी शहरातील 3 मृत्यूसह 35 रुग्ण कोरोनाबधित आढळले यानुसार एकूण कोरोनाबधित रुग्णांचो संख्या ही 897 झाली असून त्यातील 468 रुग्णांनी कोरोनावावर मात करोत घरी सुरक्षित पोहोचले आहेत यानुसार सद्यस्थितीत 395 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत तर आजपावेतो 34 रुग्ण कोरोनाबधित होऊन मृत्युमुखी पडले आहेत तर आज आढळलेल्या 3 कोरोनाबधित मृत्यूमध्ये जयभीम चौकातील 58 वर्षोय पुरुष, फुटाना ओली येथील 80 वर्षोय पुरुष तसेच दाल ओली कामठी येथील 65 वर्षोय महिलेचा समावेश आहे.तर कामठी पंचायत समितीचे उपसभापतो यांना आज बरे वाटत नसल्याने शंका दूर करण्याचा उद्देशाने केलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये पॉजीटिव्ह आढळले मात्र यांना कुठलेही लक्षण नसल्याने लाईफ लाईन हॉस्पिटल येथून उपचारार्थ औषधी पुरवठा करीत बिडगाव येथील स्वगृही गृहविलीगीकरणं करण्यात आले.

आज एकूण 35 रुग्ण कोरोना बाधित आढळले ज्यामध्ये गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ग्रामीण भागात 6, आदर्श नगर रणाळा 01, कामठी 03, कोळसाटाल 01,गुमथी 01, गौतम नगर कामठी 01, चांद्रमानी नगर कामठी 01, छावणी परिषद कामठी 06, जुनी खलाशी लाईन 02.,नया गोदाम 01, न्यू येरखेडा 05,पेरकीपूरा 02,येरखेडा 04,रविदास नगर 01 च्या रुग्णाचा समावेश आहे.या सर्व रुग्णांना नागपूर च्या शासकोय विलीगिकरंन कक्षात हलविण्यात येत आहेत


संदीप कांबळे कामठी