Published On : Sat, Dec 30th, 2017

आम आदमी पार्टी चे मनपा नगर भवनासमोर जुलमी संपत्ति कर वाढीविरोधात निदर्शने

Advertisement
  • शाळेत नाही शिक्षण, दवाखान्यात नाही उपचार, रस्त्यावर नाही डांबर, वस्त्यांमध्ये नाही पाणी, परंतु भ्रष्टाचारासाठी निर्माण केल्या जात आहेत सिमेंट रोड, तरी म्हणतात पैशाची आहे कमी.
  • सीमेंट रोड मध्ये पैसे गाडून NMC चा खजिना झाला खाली आणि आता संपत्ति कर वाढवुन करणार आहेत सामान्य जनतेचा खिसा खाली.


नागपूर: नागपूर महानगर पालिकेने नुकतेच शहरातील स्थावर मालमत्ता करांचे पुंर्निर्धारण केलेले आहे. त्यानुसार नागरिकांच्या मालमत्ता करांमध्ये सुमारे १०००-२५०० टक्के इतक्या मोठ्या अवास्तव प्रमाणात वाढ करण्यात आली आली होती, परंतु नागरिकांचा आणि राजकीय पक्षांचा रोष पाहून परवाला मा. महपौर यानीं अवाढव्य वाढ आम्ही कमी करतो परंतु १०० % वाढ राहिल अशी माहिती प्रसार मध्यमाना दिली. ही कर निर्धर्नाची सम्पूर्ण प्रक्रिया चुकीची असून शहरातील तमाम जनता १०० % वाढ सहन करण्या पलिकडे आहे. १००% वाढ हे मनपा चे सदर कृत्य निश्चितच अमानवी व जुलमी राजवटीचे द्योतक आहे. आम आदमी पार्टी याची घोर निंदा व निषेध करते.

स्थानिक स्वराज्य संस्थाना नागरिकांवर मालमत्ता कर लावण्याचा निश्चितच अधिकार आहे. यातून गोळा होणाऱ्या महसुलातून मनपाला लोकांना तमाम सार्वजनिक सोई–सुविधा जसे –दर्जेदार रस्ते, सिव्हर लाईन, वीज, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, क्रीडांगण, बगीचे, सार्वजनिक शहर वाहतूक, वाहन स्थळे, चांगल्या बाजारपेठा इत्यादी उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक आहे. असे असतांना सुध्दा वरील पैकी कोणतीही सार्वजनिक सुविधा नागरिकांना पुरविण्याचे किमान संवैधानिक कर्तव्य नागपूर महानगर पालिकेने आता पर्यंत पाळले नाहीत, ही शहरातील वस्तूस्थिती आहे.

मनपाची एकही चांगली शाळा, दर्जेदार दवाखाना नाही, डाबरी रोड तोडून भ्रष्ट्राचारासाठी फारच निकृष्ठ दर्जाचे सीमेंट रोड नव्याने निर्माण होत आहेत, कित्येक नवीन वस्त्यांमध्ये (उदा. नरेंद्र नगर, मनीष नगर न्यू मनीष नगर, संघर्ष नगर इत्यादी) रस्तेच बांधल्या गेले नाहीत. नागरिकांना चालण्यासाठी चांगले फुटपाथ नाहीत, रोड आणि फुटपाथ दर वर्षी उखडून जातात. त्यावरच वारंवार नागरिकांच्या कराचा पैसा निरर्थक खर्च होत राहते. वाहने उभी करण्यासाठी पार्किंग व्यवस्था नाही. अनेक वस्त्यांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नाही, जसे संघर्ष नगर इत्यादी. त्यातही २४ तास पानीपूरवठा करण्याच्या नावावर पाणीपुरवठा योजनेचे खाजगीकरण केले आहे, वाहतूक व्यवस्था अपर्याप्त आणि निकृष्ठ दर्जाची आहे. वाहतुक ठेकेदाराने मागील १० वर्षात मनपाला भाड्याचा एक पैसा दिला नहीं, करोडो रूपये दुबविलित परंतु प्रशासनाने काहीही केले नहीं. शिक्षण आरोग्य सोडून मंदिरांच्या जीर्णोधारावर, महपौर, नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या देशी-विदेशी दौऱ्यांवर करोडो रुपये सार्वजनिक करातून जमा केलेला पैसा उधळल्या जातो. जर शहरातील नागरिकांना आपणाकडून कोणत्याही मुलभूत सुविधा पुरविण्यात येत नसतील तर मालमत्ता कर घेण्याचाच अधिकार राहत नाही.

चालू असलेल्या कर निर्धारण संबंधित सूचना जनतेपर्यंत पोहचवून आक्षेप मागविण्यासाठी एकसूत्री कार्यक्रम राबविण्यात यायला पाहिजे परंतु प्राशासन ते करायला तयार नाही.

मागील दोन महिन्यापासून महानगर पालिकेच्या विविध झोन मध्ये नव्याने मालमत्तांचे मूल्यमापन करून कर निर्धारण केले आहे. या संबंधीत आक्षेप नोंदविण्याबाबत झोन निहाय काही ठराविक ठिकाणी सूचना करण्यात येत आहेत, परंतु या सूचना फलकावरील सूचनेबाबत झोन किंवा वार्डातील सर्वच नागरिकांना माहिती मिळतेच असे नाही. नव्याने मालमत्तांचे मूल्यमापन करण्यात येणारे कर निर्धारण हे पुढील १०-२० वर्षांकरिता असू शकते. वारंवार कर निर्धारण होत नाही. त्यामुळे ज्या नागरिकांच्या करपात्र इमारती व जमिनीचा कर निर्धारित केला जात आहे, त्यांना नव्याने आकारण्यात येणारा कर योग्य आहे किंवा नाही याची माहिती मिळणे अनिवार्य आहे.

यामुळे कर निर्धारण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा नागरिक कर भरण्यासाठी जातील तेव्हा त्यांचे आक्षेप येतील, की आमचा यापूर्वीचा कर कमी होता आता येवढा जास्त कसा? हा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ नये, आणि आपल्या कार्यात पारदर्शकता येण्यासाठी नवीन कर निर्धारण केलेली संपूर्ण माहिती / पुस्तिका जनतेपर्यंत पोहोचविणे मनपा प्रशासनाचे कर्तव्य आहे. या कर्तव्याचे पालन व्हावे आणि आता आपला कर बरोबर लागला किंवा नाही ही माहिती सर्व मालमत्ता धारकांना प्राप्त व्हावी याकरिता आम आदमी पार्टी खालील प्रमुख मागण्या करीत आहे.

  • आताचे सर्वेक्षण रद्द करुण संपत्ति कर २००८ च्या बेसरेट प्रमाणे लावावा
  • सुचनेसोबत घराचे स्केच, कराचे प्रमाण (calculation sheet) देण्यात यावे
  • सर्वांच्या मालमत्तेचे कर सर्वांना दिसण्याची ऑनलाईन पारदर्शक व्यवस्था करावी
  • नव्याने निर्धारित केलेल्या संपूर्ण कराची माहिती ऑनलाईन करून मनपाच्या वेबसाईट वर नागरिकांकरिता उपलब्ध करावी.
  • ३१ मार्च म्हणजेच आर्थिक वर्ष पूर्ण होण्याआधी २% व्याज आकारने (सावकारी) बंद करा
  • नव्याने निर्धारित केलेल्या संपूर्ण कराची माहिती/ पुस्तिका केवळ झोन कार्यालयात न ठेवता जेथे जेथे निवडणूक केंद्र असतात त्या सर्व केंद्रांवर एक आठवडा नागरिकांना तपासणी/निरीक्षणाकरिता ठेवावेत.
  • या सोबतच आक्षेप नोंदणीसाठी त्या केंद्रांवर छापील अर्जांची व्यवस्था करावी.
  • याची माहिती नागरिकांना व्हावी याकरिता प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक्स मिडीयाचा वापर करून जाहिरात द्यावी. वाहनांवर ध्वनी क्षेपणास्त्रे लावून मोहल्या मोहल्यात याचा प्रचार करावा.
  • सोशल मिडीयाचा वापर करून याबाबत ची माहिती व्हायरल करावी.
  • काही वार्ड किंवा झोन मधील मालमत्ता धारकांचा आक्षेप नोंदविण्याचा वेळ निघून गेला असला तरी त्यांनाही पुन्हा वरील माध्यमातून संधी द्यावी.
  • संपूर्ण शहरात एक तारीख निश्चित करून एकाच वेळी हा कार्यक्रम १५ दिवसांकरिता राबविण्यात यावा.

वरील मनपाचा नाकर्तेपणा लक्षात घेता मनपा नी आणलेली ही मालमत्ता करातील १०० % पेक्षा जास्त वाढ त्वरित रद्द करून कमाल वाढ ५० % पेक्षा अधिक असू नये, असे न केल्यास संपूर्ण शहरात जन आन्दोलन उभारण्यात येइल. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी मनपा ची राहिल.

आज आम आदमी पार्टी च्या कर्यकर्त्यानी जोरा जोरात घोषणाबाजी केली.

गली गली में छोर है, नागपुर की मनपा सरकार चोर है!

बंद करो बंद करो, जनता की लूट बंद करो!

यावेळी अशोक मिश्रा, प्रशांत निलटकर, प्रमोद नाईक, डॉ. अशोक लांजेवार, अजय धर्मे, अंबरीश सावरकर, राजेश तिवारी, रविंद्र गीदोडे, हेमेंत बन्सोड, शंकर इंगोले, गीता कुहिकर, शालिनी अरोरा, अमोल हाडके, विनोद अलंमढोहकर, सुभद्रा यादव, देवा गौरकर, वसंतराव गाटीबाधे, पीयूष आकरे, जगजित सिंग, दिनेश पांडे, सोनू फटींग, कृतल आकरे, दयानंद येठ्ठा, डॉ. देवेंद्र वानखडे, निलेश गोयल, संतोष वैदय, किशोर चिमुरकर, अशोक मोहिजे, शरद आकरे, संजय पिले, लक्ष्मीकांत दांडेकर, अजय शाहू, संजय शर्मा, खोरगडे काका, वीणा भोयर, सौ. माधुरी श्रीवास्तव, कुंदा राउत, मनोज जोशी इत्यादी अनेक कार्यकर्ते व् नागरिक उपस्थित होते.