Published On : Mon, Nov 25th, 2019

कन्हान येथे रामदेव बाबाच्या विरोधात निदर्शने व निषेध केला

कन्हान : – रामदेव बाबा यांनी महापुरूषा बाबत अश्लील टिपणी व शब्द प्रयोग करून आबेंडकरी जनतेच्या भावना दुखविल्या मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे रामदेव बाबाच्या विरोधात निर्देशने करून निषेध करण्यात आला.

रामदेवबाबा यानी महापुरुषाच्या बाबत अश्लील टिपणी केल्यामुळे आंबेडक़री जनतेच्या भावना दुखविल्या तसेच रामस्वामी पेरियार यांच्या विषयी अश्लील शब्दांचा प्रयोग केल्यामुळे रामदेव बाबावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. केंद्र सरकार व राज्य सरकार ने रामदेव बाबा च्या पतंजली संस्थेला दिलेल्या पूर्ण जमिनी परत घेऊन राजद्रोहाचा मामला दाखल करण्यात यावा. अशा मागण्या च्या घोषणासह बहुजनानी कुठलेही पतंजली संस्थेचे प्रोडक्ट घेऊ नये च्या फलकासह डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे रामदेव बाबाच्या विरोधात निदर्शने देऊन निषेध करण्यात आला.

या प्रसंगी रिपब्लिकन भीमशक्ति महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे, कैलाश बोरकर, युवा नेते रोहित मानवटकर, निखिल रामटेके, नितिन मेश्राम, राष्ट्रपाल पौनिकर, मुकेश टेभुर्णे, संजय गजभिये, स्वप्निल गजभिये, मेश्राम, अभिजीत चांदुरकर, रामेश्वर गोंडाने, उमेश बागड़े, नरेश चिमनकर, सुरेश गोंडाने, मनोज बोबडे, रविन्द्र दुपारे, शिंदे, मेश्राम आदीने प्रामुख्याने उपस्थित राहुन निषेध केला.