Published On : Mon, Nov 25th, 2019

कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक येथे प्रारंभ

Advertisement

रामटेक :रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात शनिवार दिनांक 23 पासून धानाच्या खरेदीला प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी धानाला प्रति खंडी दीड क्विंटल 3050 रुपये 2033 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आलं असून 3000 पोत्यांची आवक झाल्याची माहिती बाजार समिती व्यवस्थापनाने दिली.

या प्रसंगी बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक रवींद्र वसू, बाजार सचिन समितीचे सचिव हनुमंता महाजन, किशोर रहांगडाले, चरण सिंग यादव , अडतिया संघाचे अध्यक्ष सोहनलाल यादव व्यापारी रमेश पटले कैलास गायधने सूर्यभान हटवार एन.के.बी कुड, स्वप्नील पोटभरे ,अनिल गुप्ता ,राघवेंद्र मदनकर ,अशोक झाडे ,सुदेश यादव ,गोपाल काठोके, किरण कारमोरे ,रामलाल वैद्य, प्रेम यादव बबलू सहारे ,भीमा आंबील डुके ,जयपाल बडवाईक, सुरेश वांदिले उपस्थित होते.

केंद्र शासनाने साधारण धानाचा हमीभाव प्रति क्विंटल 1815 रुपये ‘ग्रेड ए’ चा 1835 रुपये आणि हायब्रीड धानाची हमीभाव प्रति क्विंटल 2550 रुपये जाहीर केला आहे रामटेक परिसरात साधारण धानाचे पीक घेतले जात असून ,शेतकऱ्यांना पहिल्या दिवशी हमीभावापेक्षा मागे 218 रुपये अधिक भाव मिळत आहे. रामटेक बाजार समितीच्या यार्डात धानाची खरेदी- विक्री दस सोमवार बुधवार व शनिवार केली जाणार असून, रविवार दिनांक 24 पासून कापसाच्या खरेदीला प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती बाजार समिती व्यवस्था दिली