Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jun 24th, 2020

  लाॅकडाऊन काळातील वाढलेले विद्युत बिल कमी करण्याची मांगणी

  कन्हान : – देशात व महाराष्ट्रात कोरोना विषाणु आजाराचा प्रादुर्भाव रोखण्या क रिता टाळेबंदी व संचारबंदी मागील तीन महिने लावण्यात आल्याने सर्व कामधंदे बंद करून लोक नियमाचे पालन करित आपल्या घरात होते. विधृत वितरणाने सुध्दा तीन महिन्याचे बिल न देता तीनही महिन्याचे एकत्र बिल दिल्याने नागरिकां सामोर मोठे आर्थिक भुदंडाचे संकट उभे ठाकल्याने प्रहार संघटना व्दारे महावित रण कार्यालयावर मोर्चा काढुन बिलातील त्रुटया काढुन, बिल माफ करून कमी करण्याची मागणी केली.

  मंगळवार (दि.२३) ला प्रहार संघटना कन्हान व्दारे जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे यांच्या नेतुत्वात तारसा रोड शहीद चौक ते महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी उप विभागीय अभियंता कार्यालय कन्हान पर्यंत नागरिकांनी मोर्चा काढुन निवेदन देऊन बील माफ करण्याची मागणी के ली की, संपुर्ण देशात व राज्यात कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता टा ळेबंदी व संचारबंदी मागील तीन महिने लावण्यात आल्याने सर्व कामधंदे बंद क रून लोक नियमाचे पालन करित आप ल्या घरात होते. यामुळे गरीब, मजुर व मध्यमवर्गीयाना जिवनापयोगी वस्तु, उद रनिर्वाह करिता हालअपेष्टा सहन करित कसे तरी जीवन जगावे लागले. नागरिकां च्या समस्या बघता सरकारला टाळेबंदीत हळुहळु सुट देण्यात येत असताना महा. राज्य महावितरण कंपनी व्दारे तीन महि न्याचे एकत्र विधृत बिल त्रुटया असलेले मोठया प्रमाणात पाठविल्याने “दुष्काळा त तेरावा महिना” अशी बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना गंभीर आ र्थिक संकट उभे ठाकले आहे. यास्तव प्रहार संघटनेने महावितरण कार्यालय सामोर विधृत बिल जाळुन रोष व्यकत केला.

  आणि तीन महिन्याचे एकत्र बिल दिल्या ने दहा ते पंधरा हजार रू बिल त्रुटया रहित दिले आहे. तेच एक, एक महिन्या चे बनविले असते तर युनिट दर कमी होऊन कमी बिल आले असते.तीन महिने सर्व कामधंदे बंद असल्याने मोठ या प्रमाणात आलेले विधृत बिल भरणे गंभीर संकट नागरिका सामोर ठाकल्याने विधृत बिल माफ करून राज्य सरकारने मध्य प्रदेश राज्य सरकार सारखे १०० रू प्रमाणे बिल देऊन, बिलाच्या त्रुटया कमी कराव्या. अशी मागणी अभियंतास निवे दन देऊन केली आहे. अन्यथा प्रहार संघ टने व्दारे नागरिकांच्या न्यायीक मागणी करिता तिव्र आंदोलन करण्यात येईल.

  असा ईसारा दिला. याप्रसंगी प्रहार संघ टना नागपुर जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे, अॅड. आशाताई पनिकर, अॅड मनिषा पारधी, सनोज पनिकर, प्रशांत वाघमारे, विनोद किरपान, हर्ष पाटील, संदीप कभे, चंदन मेश्राम, किरण ठाकुर,महेंन्द्र साबरे, उमेश भोयर, अंकुश बादुले, सचिन घोड मारे, सुरज प्रसाद, मनोज देवांघण,प्रविण बेलखोडे, अशोक रोडेकर, मनोज कलचु री, शंभु श्रीवास्तव, मयुर भोपडे, शितल भिमनवार, उज्वल भिमनवार, शैलेश माटे, विश्वजीत मेहरा, राजेश मोहरकर, विजय पारधी, देवराव भालधरे, रामदास भेलखोडे, कैलास सावरकर, आशिष पाटील, सुधाकर भुंदे, निखिल डोंगरदिवे , विक्की सोलंकी, वसीम भाई, राजेश गजभिये, आकाश गिरडकर, गोलु कटे वार, अंकित गणोरकर, विजय पाली, महेश भोपचे,संदीप नेवारे,बिपीन गोंडाणे , सोहेल खान, प्रमोद राऊत, अनिल सुते, उनित खंगाले, कार्तिक टेकाम, हिमांशु तिरपुडे आदी प्रहार कार्यकर्ते व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145