Published On : Mon, Jul 22nd, 2019

कन्हान नगरपरिषद आवारात व्यवस्थित शौचालय बनविण्याची मागणी

ऋृषभ बावनकर चे नगर परिषद प्रशासनाला निवेदन.

कन्हान : – नगरपरिषद कार्यालयाच्या बाहेर नागरिकाकरिता बनविण्यात आलेल्या शौच्छालयाचा दरवाजा तुटल्याने तो त्वरीत बनविण्यात यावा तसेच नगरपरिषद आवारात पुरूष व महिला करिता स्वतंत्र शौचालय बनविण्यात यावे. अशी मागणी भाजपा कन्हान शहर प्रसिध्दी प्रमुख ऋृषभ बावनकर ने नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन केली आहे.

कन्हान पिपरी नगरपरिषद कार्या- लयाच्या आवारात ” स्वच्छ भारत अभियान ” अंतर्गत नागरिकाकरिता नगरपरिषद प्रशासना व्दारे शौचालय बनविण्यात आले असुन व्यवस्थित काम न करण्यात आल्याने काही दिवसांतच शौचालयाचा दरवाजा तुटला त्यामुळे नगरपरिषद मध्ये कामाकरिता येणा-या शहरवासीयाना तसेच लागुनच असलेल्या सेतु केंद्रात आलेल्या शहर व ग्रामीण नागरिकांना सौचालयास कुठे जावे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नगरपरिषदेत व सेतु केंद्रात विविध समस्या सोडविण्या करिता आणि कागदपत्र तयार करण्याच्या कामाकरिता दररोज नागरिकांना यावे लागते. यामुळे नगरपरिषद आवारात पुरूष व महिला करिता स्वतंत्र शौचालय बनविण्यात यावे. जेणे करून विविध कामाकरिता येणा-या नागरिकांना शौचालया करिता त्रास सहन करावा लागणार नाही. यास्तव नगरपरिषद आवारात व्यवस्थित शौचालय त्वरित बनविण्याची मागणी भाजपा कन्हान शहर प्रसिध्दी प्रमुख ऋृषभ बावनकर हयानी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन केली आहे.