Published On : Sat, Aug 17th, 2019

३७० हटवल्याने सगळ्यांचे भले होणार – शिवानी दाणी वखरे

Advertisement

नागपुर: धारा ३८० काढून केंद्र सरकार ने काश्मीर व भारताच्या हितासाठी नव्या संधी उघडल्या आहेत व त्याने सर्वांचे भलेच होईल अशी वक्तव्य भाजयुमो नागपूर चा अध्यक्षा शिवानी दाणी वखरे ह्यांनी स्वतंत्र दिनानिमित्त अग्रेसर फाऊंडेशन द्वारा आयोजित कार्यक्रमात केले.

राजकारण व अर्थशास्त्र हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून एक समजल्याशिवाय दुसरे समजणं अशक्य आहे. धारा ३७० हे एक राजनैतिक शास्त्र असून पूर्वी च्या राजकर्त्यांनी काश्मिरी लोकांचं शोषण करायला वा त्यांना आर्थिक सक्षमते हून दूर ठेवण्यााठी केला. आता धारा ३७० काढल्यामुळे जम्मू व काश्मीर ची आर्थिक वृद्धी होईल व निर्यात आणि पर्यटन द्वारे काश्मीर सुद्धा भारताच्या अर्थव्यवस्थेत योगदान करेल.

कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून राष्ट्र सेविका समिती क्या प्रमुख शांतक्का, भाजप चे पूर्व सरचिटणीस रवी भुसारी व संघाचे महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते.

याठिकाणी बोलत असताना राजेश लोया म्हणाले की प्रत्येक व्यक्तीने भारताच्या हितासाठी आपले योगदान करावे व आपले काम प्रामाणिकपणे करावे. ह्यानेच खऱ्या अर्थाने देशाची वाढ होईल.

शंताक्का, कार्यक्रमास अशिर्वाचन देताना म्हणाल्या की विश्र्वविधाता होण्यासाठी भारत सक्षम आहे पण त्यासाठी प्रत्येक भारतीयाने त्या ध्येयाने पाऊल उचलले अनिवार्य आहे. चीन अती महत्त्वाकांक्षी असून आपले हितचिंतक नाहीये त्यामुळे भारतीयांनी प्रयत्नपूर्वक चिनी वस्तूंचा त्याग करावा
अग्रेसर फाऊंडेशन द्वारा आयोजित ह्या कार्यक्रमाची सुरुवात ‘ बे एके बे ‘ ह्या शैक्षणिक उपक्रमाने झाली. गणिताचा प्रचार प्रसार करायचा दृष्टीने हे उपक्रम सुरू केले आहे. जे वर्ष गणित वर्ष म्हणून मनवण्यात येणार असून माध्यमिक शाळांमध्ये पाढ यांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामनुजन ह्यांच्या स्मृतीत हे उपक्रम करण्यात येणार असून कार्यक्रमात बे एके बे डिझाईन असलेले टीशर्ट च अनावरण करण्यात आलं. ह्या टीशर्ट च्या विक्रीतून येणारा पैसा गरजू मुलांचा शिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचं संचालन नाहुढ बडगे ह्यांनी केला व अग्रेसर फाऊंडेशन ची माहिती अभिजीत पोटे ह्यांनी दिली.