Published On : Mon, Nov 11th, 2019

फ्रांस आणि जर्मनीचे शिष्टमंडळ ३ दिवसीय नागपूर दौऱ्यावर

वित्त पुरवठा संस्थांनी केले नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे कौतुक

नागपूर -महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरु असलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी के.एफ.डब्लू. जर्मनी आणि ए.एफ.डी फ्रांस सरकारच्या अंतर्गत विकास बँकेतर्फ नेमण्यात आलेली कमेटी ३ दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर नागपूर येथे आले असून दिनांक १० नोव्हेंबर २०१९ रोजी या चमूने नागपूर मेट्रोच्या प्रवासी मेट्रो मार्गाचे निरीक्षण करत त्यांनी व्यावसायिक स्टेशनची पाहणी केली.प्रतिनिधी मंडळाने रविवारी नागपूर मेट्रोतून प्रवास करत प्रकल्पांची माहिती घेतली. के.एफ.डब्लू.आणि ए.एफ.डी. या दोन्ही वित्तीय संस्थांनी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या संयुक्त देखरेख मिशन अंतर्गत या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची अंबलबजावणी कश्या प्रकारे सुरु आहे ;ज्यामध्ये तांत्रिकी,वित्तीय आणि इएसएचएस दृष्टीकोन तपासण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

तसेच आज दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोजी या वित्तीय संस्थांनी सिव्हील लाईन्स, स्थित मेट्रो हाउस येथे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित यांची भेट घेत प्रकल्पा संदर्भात विस्तुत चर्चा केली. डॉ. दीक्षित यांनी प्रकल्पाच्या भौतिक आणि वित्तीय प्रगतीची माहिती वित्तीय चमूला देत मेट्रो द्वारे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाची माहिती देखील त्यांनी यावेळी त्यांना दिली.चर्चेदरम्यान जर्मनी आणि फ्रांसच्या शिष्टमंडळाने महा मेट्रोद्वारे, राबविण्यात येत असलेल्या मल्टी मॉडल इंटिग्रेशन, ट्रांझिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी),कॉमन मोबिलीटी कार्ड, फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी,फीडर सर्व्हिस तसेच सोलर उर्जा प्रकल्पाचा आढावा घेत प्रकल्पाची शिष्टमंडळाने मेट्रोच्या संपूर्ण कार्याची प्रशंसा केली.

Advertisement

या शिष्टमंडळात के.एफ.डब्ल्यू. जर्मनीचे प्रकल्प व्यवस्थापक (के.एफ.डब्ल्यू. फ्रांफर्ट) श्री.क्रिस्टीयन वोस्लर, तांत्रिक तज्ञ (के.एफ.डब्ल्यू. फ्रांफर्ट) श्री.पीटर रुनी, सेफगार्ड तज्ञ (के.एफ.डब्ल्यू. फ्रांफर्ट) श्रीमती.जुटा वोल्मर, सेफगार्ड तज्ञ(के.एफ.डब्ल्यू. दिल्ली) श्रीमती. सविता मोहन राम,वरिष्ठ क्षेत्र तज्ञ(के.एफ.डब्ल्यू. दिल्ली) श्रीमती. स्वाती खन्ना तसेच ए.एफ.डी. फ्रांसचे भारतातील व्यवस्थापक श्री.ब्रुनो बोसल, सेफगार्ड तज्ञ(एएफडी –पॅरीस) श्रीमती.सिल्वेन बर्नाड-श्रीनिवासान, प्रकल्प व्यवस्थापक(एएफडी – दिल्ली)श्री. रजनीश अहुजा यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. तसेच महा मेट्रोच्या वतीने संचालक(प्रकल्प) श्री.महेश कुमार,संचालक (रोलिंग स्टॉक) श्री. महेश सुनील माथुर, संचालक(वित्त) श्री. एस.शिवमाथन, संचालक (प्रकल्प नियोजन) श्री.रामनाथ सुब्रमण्यम,कार्यकारी संचालक(प्रशासन) श्री.अनिल कोकाटे यावेळी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement