Advertisement
नागपूर : उत्तर नागपूर स्थित मौजा बिनाखी अंतर्गत राणी दुर्गावती चौक येथील नासुप्र संकुल समोरील फुटपाथवरील अतिक्रमण काढण्यात आले.
नागपूर सुधार प्रन्यासतर्फे आज मंगळवार दिनांक ११ जून २०१९ रोजी सदर कारवाई करण्यात आली.
विभागीय अधिकारी (उत्तर) श्री सुधीर राठोड, स्था. अभि सहाय्यक श्री नरेंद्र दराडे व हेमंत गाखरे तसेच नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख श्री.मनोहर पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
Advertisement