Published On : Tue, Jun 9th, 2020

पोलिसांच्या गाडीने हिरणचा अपघात, परिश्रम घेऊन वाचविले प्राण

कन्हान : रविवार रात्री ११.३० वाजताच्या सुमारास हेड क्वाटर नागपूर वरून रामटेकला पेट्रोलिंग करीता गाडी क्र MH 31 DZ 717 ने काही पोलीस जात असतांना केरडी गावाच्या शिवारातून रोड ओलांडण्याच्या हेतूने अचानक एक हिरण पोलिसांच्या गाडी समोर आले ज्यामुडे हिरणाच्या पायाला दुखापत झाली व ते जागीच पडून राहिले घटनावेळी मागून येत असतांना सामाजिक कार्यकर्ते रोहित मांनवटकर व अमोल मेश्राम यांनी सर्व बघितले व पोलिसांची मदद करीत वन विभागाला संपर्क केला

व तिथेच हिरणची काळजी घेत सर्व बघितले तब्बल २ तासा नंतर वनविभागाची गाडी आली आणि हिरणला प्राथमिक उपचार देत नागपूर येथील रेस्क्यु सेंटर मध्ये नेण्यात आले हिरण सुखरूप असून त्याला लवकरच जंगलात सोडण्यात येईल असे वनविभागाने सांगितले असून हिरणला सामाजिक कार्यकर्ते रोहित मानवटकर, अमोल मेश्राम, नितीन मेश्राम, पोलीस विभागाचे चाचेरे, लोखंडे, सहारे व वनरक्षकचे एन एस मुसडे, शुभम कोरगडे मुडे जीवनदान मिडाला.