रामटेक : महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागा द्वारे नुकतेच रामटेक तहसील ऑफिस मध्ये पारशिवनी व रामटेक तालुक्यात दिनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आले .
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार सारिका रासकर हया होत्या , आपल्या अध्यक्षीय भाषणात सारिका रासकर म्हणाल्या की ” दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाला सुरुवात झाली असून 15 जुलाई ते 14 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या अभियानाला सर्वानी एकजुटीने काम करा .या अभियान अंतर्गत वंचित कूटूम्बाना शिधापत्रिका , व गैस कनेक्शन मिळणार आहे .
हया अभियानाच्या माध्यमातून आता गावे धूरमुक्त होणार असून प्रत्येक लाभार्थीने हया योजनेचा लाभ घ्यावा .असे मत हया प्रसंगी केले . . सदर अभियान बद्दल सविस्तर प्रस्ताविक माहिती देताना पुरवठा निरीक्षक आतिश जाधव यांनी सांगितले की “या अभियान अंतर्गत सरकारची योजना समाजाच्या प्रत्येक घटका पर्यंत पोहचविन्याचा आपण सर्व मिळून कसोशीने प्रयत्न करू असे मत व्यक्त केले .
ह्यावेळी अपंग ,गरजू लाभार्थ्यांना अंतोदय व प्राधान्य कुटुंबाचा लाभ देण्यात आला .तर प्रमुख पाहूणे म्हणून संजय गांधी निराधार योजनेचे एस डी पाटील,निरीक्षण अधिकारी स्वप्नील पडोळे ,पुरवठा निरीक्षक नागार्जुन खैरे व पुरवठा विभागाचे इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात रास्त भाव दुकानदार, अनुलोम प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अतिश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन तितीक्षा बारापात्रे यांनी केले. .