Published On : Sat, Jul 20th, 2019

गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणारे वाहन उलटले, एका बैलाचा जागिच मृत्यु

Advertisement

कामठी :-कामठी येथील भाजी मंडी स्थित अवैध कत्तलखान्यात कत्तलीसाठी गोवंश जनावरांना अवैधरित्या वाहून नेत असलेल्या वाहनचालकाने पोलिसांपासून बचाव करण्याच्या हेतूने भरधाव वेगाने वाहन वाहून नेत असता अचानक वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले ज्यामध्ये एका बैलाचा जागिच मृत्यू झाला तर एक बैल गंभीर जख्मि झाले तसेच इतर सहा बैल सुदैवाने बचावले .

ही दुर्दैवी घटना काल रात्री साडे दहा वाजेदरम्यान नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा-घोरपड वळनमार्गावर घडली.तर आरोपी वाहांचालकाने घटनास्थळाहुन पळ काढण्यात यश गाठले.पोलिसांनी वेळीच पोहोचून गोवंश जनावरांना नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षीत हलवून जीवनदान दिल्याची कारवाही करीत पसार आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवीत वाहन तसेच गोवंश जनावरे जप्त करीत एकूण 5 लक्ष 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गादा मार्गावरून गोवंश जनावरांची तस्करी होत हे गोवंश जनावरे भाजी मंडी स्थित अवैध कत्तलखान्यात कत्तलीसाठी वाहून नेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच गादा मार्गावर पोलीस गस्त करीत असलेल्या पोलिसांनी गादा कडे भरधाव वेगाने येत असलेल्या पिकअप क्र एम एच 28 बी बी 0065 या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता पिकअप वाहांचालकाने वाहन न थांबविता वाहन भरधाव वेगाने पुढची वाट धरली दरम्यान पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केला

असता पाठलाग करीत असलेल्या पोलीसापासून बचाव करण्यासाठी वाहन अति तेज गतीने पळवून बचाव करण्याचा प्रयत्न केला मात्र दरम्यान पिकअप वाहनचालकाचे नियंत्रण सुटले व गादा-घोरपड बाह्य वळण मार्गावरील गुरुकृपा ऍग्रो एजन्सी समोर गोवंश जनावराने लादून भरलेले पिकअप वाहन उलटले यावेळी वाहनात निर्दयतेने लादून असलेले 8 गोवंश जनावरा पैकी एका बैलाचा जागीच मृत्यू तर एक बैल गंभीर जख्मि झाल्याची घटना घडली होती तर आरोपी वाहन चालकाने संधी साधून पळ काढण्यात यश गाठले दरम्यान वेळीच नवीन कामठी पोलीसांनी घटनास्थळ गाठून यातील 6 बैलांना नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान देण्यात आले तर मृतक बैलावर अंत्यविधी करीत जख्मि बैलावर पशु वैद्यकीय अधिकारि च्या वतीने उपचार करण्यात आले.यानुसार पोलीसांनी 1 लक्ष 20 हजार रुपये किमतीचे गोवंश जनावरे तसेच पिकअप वाहन क्र एम एच 28 बी बी 0065 किमती 4 लक्ष 50 हजार रुपये असा एकूण 5 लक्ष 70 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करीत अज्ञात पसार आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी