Published On : Fri, Apr 9th, 2021

धंतोली पार्क येथे नवीन खेळणी चे लोकार्पण

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या धंतोली येथील मेजर सुरेन्द्र देव पार्क मध्ये लहान मुलांसाठी नवीन आकर्षक खेळणीचे लोकार्पण प्रभाग १६ चे नगसेवक तथा मनपा क्रीडा समितीचे उपसभापती श्री. लखन येरवार यांच्या हस्ते पार पडले.

धंतोली पार्क मध्ये माजी महापौर श्री. संदीप जोशी यांच्या विशेष प्रयत्नाने खेळणी लावण्यात आली आहे.


यावेळी ऋषिकेश चक्रदेव, साहिल, मुन्ना बोरीकर, प्रमोद संतापे, तूफान पारेकर, अशोक राऊत, संदीप, प्रतिभा वैरागडे, प्रतिभा मिश्रा, कामना सोनवणे आदी उपस्थित होते.