Published On : Fri, Apr 9th, 2021

शुक्रवारी ११ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. ९ एप्रिल) रोजी ११ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,२५,००० चा दंड वसूल केला.

पथकाने अरिहंत रुग्णालय रामदासपेठ यांचेवर जैविक कचरा सामान्य कच-यामध्ये टाकल्याबद्दल रु. ५० हजाराचा दंड लावला.

पथकाने ७० प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.