Published On : Mon, Oct 12th, 2020

आरोग्य तपासणी मोबाईल व्हॅनचे लोकार्पण

Advertisement

भंडारा : कोविड-19 या आजाराची तपासणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या मोबाईल आरोग्य तपासणी व्हॅनचे लोकार्पण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. आरबीएल बँकेच्या सौजन्याने तयार करण्यात आलेली ही आरोग्य तपासणी व्हॅन जिल्हयात फिरून नागरीकांची कोरोना तपासणी करणार आहे.

जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. माधुरी माथूरकर, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटला व विनय चौधरी यावेळी उपस्थित होते.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या आरोग्य व्हॅनमध्ये एक डॉक्टर व त्यांची टिम असणार आहे. पल्स ऑक्सिमिटर, ताप तपासणी यंत्र व मेडिसीन या व्हॅनमध्ये उपलब्ध असेल. ताप तपासणे, रक्तदाब तपासणे, मधुमेह तपासणी आदी आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. नागरिकांना अगदी मोफत औषधी देण्याची व्यवस्था या व्हॅन सोबत आहे. गंभीर आजार असलेल्या रूग्णांना संदर्भीय सेवा सुद्धा देण्यात येईल. ही मोबाईल व्हॅन जिल्हयात फिरून नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या विनंती वरून एचडीएफसी बॅंकेतर्फे सुविधायुक्त अशीच आणखी आरोग्य तपासणी मोबाईल व्हॅन जिल्हयाला लवकरच उपलब्ध करण्यात येईल असे कौस्तुभ भुतडा यांनी सांगितले.

सामान्य रूग्णालयास क्लाउड किवास भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातर्फे जिल्हा सामान्य रूग्णालयास क्लाउड क्युआस भेट देण्यात आले. 33 आजाराच्या वैद्यकीय तपासण्या करणारी ही स्वयंचलीत मशीन असून रूग्णालयात येणाऱ्या नागरिकांना या मशीनव्दारे आपली स्वता तपासणी करणे शक्य होणार आहे. याच बरोबर 500 ट्रूनॅट कार्टीजेस सामान्या रूग्णालयास देण्यात आले. कोरोना योध्यांना कोविड एज्युटेंमेंट सिस्टम भेट देण्यात आली.

Advertisement
Advertisement