Published On : Tue, Feb 8th, 2022
By Nagpur Today Nagpur News

प्रभाग १७ मधील विरंगुळा केंद्राचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते लोकार्पण

Advertisement

नागपूर : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून प्रभाग क्र. १७ मध्ये निर्माण झालेल्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण मंगळवारी (ता. ८) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गुजरवाडी येथे महापौर निधी अंतर्गत परिसरातील सौंदर्यीकरण कामाचे सुद्धा महापौरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

Gold Rate
27 June 2025
Gold 24 KT 96,400 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver/Kg 1,07,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी प्रभाग १७ चे नगरसेवक प्रमोद चिखले, प्रकाश मोरे, रवींद्र कुंभलकर, प्रविण भगत, राजुभाऊ जाधव, राकेश भोयर, देशकर, संदिप माने, अरुण गाडगे, राजु डेकाटे, नरेंद्र गौतम, मिथुन भोंदले, निरजा पाटील, संध्या आसोले, अनिता शर्मा, सावंत, मेघा शिंदे, साधना सेलोकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement