महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षातील ताकदवान चेहरा आहे. ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आपल्या मजबूत नेतृत्वासाठी आणि प्रभावी कारभारासाठी ओळखले जाणारे फडणवीस यांनी 2014 ते 2019 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. मात्र २०२० मध्ये फडणवीस यांची लोकप्रियतेत घट झाल्याचे दिसत आहे. तसेच राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून भाजपचे पक्षश्रेष्ठीही फडणवीस यांच्यावर नाराज असल्याची चर्चाही सुरु आहे. त्यामुळे आगामी २०२४ मध्ये भाजपकडे फडणवीस सोडता महाराष्ट्राचे नेतृत्व करणार ताकदवर नेता कोण ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
नोव्हेंबर 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मनोरंजक वळणानंतर फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. मात्र यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. महाराष्ट्र येथे जन्मलेले देवेंद्र फडणवीस हे राजकीयदृष्ट्या सक्रिय कुटुंबातील आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला तरुण वयात सुरुवात केली आणि 2013 ते 2014 या कालावधीत महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षांसह पक्षात विविध भूमिका बजावत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली. त्यांनी पहिल्यादांच राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचे नेतृत्व केले. मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला.
आगामी २०२४ च्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजपने तयारी सुरु केली असली तरी कोणत्या नेत्याच्या नेतृत्वात भाजप निवडणूक लढणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना वगळता भाजपचे नेते आशिष शेलार यांनाही जर पक्षनेतृत्वाने जबाबदारी दिली तरी ते फारशी यशस्वी ठरणार नाही. तसेच देशात ज्या प्रकाराने मोदी लाट होती त्या मोदी लाटेचा फायदाही भाजपाला होणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे पुढे काय होणार हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.