Published On : Wed, Sep 26th, 2018

तीन बँकांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय जाहीर

Advertisement

नवी दिल्ली : बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक या तीन सरकारी बँकांचे एकत्रीकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. या बँकची आर्थिक तसेच परस्थिती सुधारावी, या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जेटली यांनी दिली.

केंद्र सरकारने गेल्या वर्षीही याच स्वरूपात निर्णय घेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अखत्यारीतील पाच बँकांचे एकत्रीकरण केले होते. स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, भारतीय महिला बँक इत्यादी बँकांचा त्यात समावेश होता. त्याच धर्तीवर या तीन बँकांचे एकत्रीकरण होणार आहे. त्यानंतर अस्तित्वात येणारी बँक ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी बँक ठरेल. या एकत्रीकरणानंतरही या बँकांची स्वतंत्र ओळख कायम राहणार आहे. या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे कर्मचारी कपात होणार नाही.