Published On : Tue, Aug 13th, 2019

शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुका स्तरावर केली कर्जमाफी तक्रार निवारण समिती

रामटेक: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे व सहकार विभागाच्या विविध कार्यालयाकडे प्राप्त होत आहे.पण या योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून नव्याने कर्जपुरवठाही केला जात नाही.

त्यामुळेच शासनाच्या वतीने दिनांक १२ जुलै २०१९ चया शासन निर्णयानुसार तालुकास्तरावर तालुका तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली असून शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात आवश्यक त्या कागद पत्रासहीत लेखी स्वरूपात तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था तालुका रामटेक व पारशिवनी या कार्यालयात तक्रार दाखल करून समाधान करून घ्यावे असे आवाहन रवींद्र वसू सहायक निबंधक,सहकारी संस्था तालुका रामटेक व पारशिवनी यांनी केले आहे .

तालुका स्तरावर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे अध्यक्षतेखाली कर्जमाफी तकार निवारण समितीची सभा प्रत्येक सोमवार व गुरुवारी सकाळी 10 ते 4 या वेळेत होणार असून संबंधित अर्जदार व बँक प्रतिनिधी यांना बोलावून अर्जाचा निपटारा संबधीत कार्यालयात जलद गतीने केला जाणार असल्याचे मत रामटेक व पारशिवनी तालुकयाचे सहाय्यक निबंधक रवींद्र वसू यांनी व्यक्त केले . यापासुन वरील दोनही तालुकयातील शेतकरी यांना फायदाच होणार असलयाचे देखील ह्यावेळी सहायक निबंधक रवींद्र वसू यांनी सांगितले .