Published On : Mon, Oct 9th, 2017

किटकनाशकांमुळे झालेले मृत्यू हे नरसंहारच, मुख्यमंत्री उंटावरून शेळ्या हाकताहेत – भाजप खासदार नाना पटोले

Advertisement

BJP MP Nana Patole
नागपूर:
राज्यभरात किटकनाशकाच्या विषबाधेमुळे ४० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आकडा राज्य सरकारने जाहिर केल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यवतमाळात जाऊन या परिस्थितीचा आढावा घेतला नसल्याबद्दल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री ड्राय पोर्टच्या भुमिपुजनाच्या निमित्ताने वर्ध्यात गेले होते पण शेजारच्या यवतमाळच्या शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही असेही नाना पटोले म्हणाले.

मुख्यमंत्री मुंबईत राहून उंटाहुन शेळ्या हाकत असल्याचह नाना पटोले म्हणाले. दरम्यान यवतमाळात झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूची तुलना नरसंहारासोबत किशोर तिवारी यांनी केली आहे ती योेग्य असल्याचही नाना पटोले म्हणाले आणि सरकारने यासंदर्भात भुमिका घ्यावी अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागेल असेही नाना पटोले म्हणाले.