Published On : Mon, Jan 22nd, 2018

उदयोन्मुख अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं रेल्वे अपघातात निधन

Advertisement

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या ‘कुंकू’ मालिकेत जानकीच्या भावाची गण्याची भूमिका साकारणारा अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन झालं. सोमवारी पहाटे मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह सापडला. बालकलाकार म्हणून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणारा प्रफुल्ल कुंकू मालिकेमुळे घरघरात पोहोचला होता.

अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘बारायण’ सिनेमातही त्याने भूमिका साकारली होती. मालाडजवळ रेल्वे अपघातात प्रफुल्लचे निधन झाले. कलर्स मनोरंजन वाहिनीवरील तू माझा सांगती, नकुशी, ज्योतिबा फुले या मालिकांमध्येही त्याच्या भूमिका गाजल्या.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement