Published On : Thu, Jan 11th, 2018

मेयो हॉस्पिटल मधे डीन पदी नियुक्ति घोड्यावरुन वाजतगाजत मिरवणूक “युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन”


नागपूर: मुख्यमंत्र्याच्या शहरातील मेयो हॉस्पिटल येथे गेल्या वर्षभरापासुन पूर्ण वेळ डीन नव्हते. नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी नितिन गुरव,फजलुर कुरेशी,पंकज निमजे, मयूर माने यांच्या नेतृत्वात घोड्यावर बसून वाजतगाजत श्रेयश जगदीश मोटघरे यांची मेयो च्या डीन पदी नियुक्ति करण्यात आली यावेळी ढोल-ताशे वाजविन्यात आले मेयोच्या अधिक्षका मांजरेकर, प्रभारी डीन श्रीखंडे यांना युवक काँग्रेस कित्येक वेळा रुग्णाचे हाल होत आहे. असे निवेदन दिले पण मेयो कड़े यांचे लक्ष नाही.

हाईकोर्टाचे स्पष्ठ निर्देश गिरीश महाजन यांच्या खात्याला १५ दिवसात डीन नियुक्त करा. असे आदेश दिले असतांनाही हाईकोर्टाचा अपमान करण्यात आला. आज युवक कांग्रेसने डीन पदी नियुक्ति केली. हाईकोर्टाचा दूसरा आदेश २४२ कर्मचारी वर्ग ४ पदाखाली भर्ती करा. तो पण आदेश धूड़काऊंन लावला. ही मुख्यमंत्र्याच्या गृह शहरातील शोकांतिका आहे. मेयोच्या अधिक्षका या मेयोत कमी बाहेरच्या खाजगी दवाखान्यात गूँगीचे औषध देण्याकरिता जातात. यांच्या खाली ४ उपनिरीक्षक आहे ते पण कधीच उपलब्ध राहत नाही. प्रभारी डीन श्रीखंडे या ही मेयोतिल प्रशासनाकड़े लक्ष देत नाही व त्या ही आपल्या जागेवर राहत नाही मेयोला बेवारस अवस्थेत सोडलेले आहे बाह्यरुग्ण विभागात कोणीही प्राध्यापक व सीनियर डॉक्टर नसतात आलेल्या रुग्णाना शिकाऊ डॉक्टर तपासतात त्यामुळे रुग्ण दगावतो शिकाऊ डॉक्टरांनी योग्य उपचार न करता रुग्णाच्या नातेवाईकावर गुन्हे दाखल करतात नातेवाईक जाब विचारतात तर पुलिसांना पाचारण केले जाते व रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण होते O.P.D मधे डॉक्टर बसत नाही पूर्ण वेळ तेथे शिकाऊ डॉक्टर बसतात या कारण मेयो मधे डीन नसल्यामुळे व अधिक्षका,प्रभारी डीन नेहमीच बाहेर असतात यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही त्यांना नॉन प्रैक्टिस अलाउंस देण्यात येतो O.P.D मधे सीनियर व तज्ञ डॉक्टर फक्त वैद्यकीय प्रतिनिधिना भेटन्यासाठी येतात त्याचे कारण प्रतिनिधि कडून टक्केवारी मिळते सामान्य रुग्नणाना तज्ञ डॉक्टर भेटत नाही ही पण शोकांतिका आहे.


मेयोतिल डॉक्टर रवि चव्हाण यांचा मानकापुर येथे खासगी दवाखाना असल्यामुळे ते पूर्ण वेळ आपल्या दवाखान्याला देतात तसेच अस्थिरोग तज्ञ डॉक्टर कोईचाडे हे कधीच भेटत नाही सर्जरी विभागाचे सर्जन डॉ.लांजेवार उपलब्ध राहत नाही असा भोंगळ कारभार असल्याचा आरोप नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांनी केला व म्हणाले अधिक्षकांनी सर्जरी किती केल्या त्याचा लेखा जोखा सादर करावा मेयोत ही खासगी करणाचा धंदा उचलण्यात आला सँनेटरी इंनिस्पेक्टर नी १०० सफाई कामगार खासगी कर्मचारी म्हणुन नेमले व १०० कर्मचारी खाजगी नियुक्त केले नागपूर लोकसभा युवक काँग्रेस ने मेयो परिसरात सर्वेक्षण केले असता ३५ कर्मचारी कामावर होते ६५ कर्मचारी कुठे गेले?त्या कर्मचारयांचा पगार कोन घेतात?मेयोत सिटीस्कैन मशीन बंद पडली आहे.


रुग्णाना बाहेरुन स्कैन करायला त्यांच्या मर्जितल्या लैब मधे पाठवितात कारण यांची साठगाँठ असते युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रुग्णाना O.P.D मधे घेऊन जातात तेव्हा तज्ञ डॉक्टर नसतात अस्थिरोग विभाग,सर्जरी विभाग व प्रत्येक विभागात जबाबदार व सीनियर डॉक्टर भेटत नाही या सर्व प्रकाराला मेयोच्या अधिक्षका व प्रभारी डीन जबाबदार आहे मेयोतील गैर कारभारावर नियंत्रण नसून त्यात ते ही सामील आहे आज युवक कांग्रेसने आपल्या स्टाइल ने आंदोलन करुन पूर्ण वेळ डीन दिला आजच्या या आंदोलनात श्रेयश मोटघरे, सतीश जोगे, विलास डांगे, नागेश जुनघरे,युगल विदावत,अखिलेश राजन, सुशांत सहारे, निखिल कापसे, तुषार मदने, फरदीन खान, निखिल वाढरे, प्रफुल इजनकर, नितिन डंडे,सौरभ शेळके, राजेन्द्र ठाकरे, इमरान शेख, अतुल मेश्राम,गुड्डू भाई, विजय मिश्रा, अक्षय घाटोले, पूजक मदने, शेख अज़हर, फैज़ान खान, हेमंत कातुरे, आशीष लोनारकर, नितिन गुरव आदि उपस्थित होते.