Published On : Mon, Jul 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

समृद्धी महामार्गावर मृत्यूचे तांडव; भीषण अपघातात सहा जणांचा होरपळून मृत्यू

Advertisement

नागपूर -समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताने सहा जणांचा बळी घेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर येथील एकाच कुटुंबातील तिघांसह कार चालक आणि आयशर ट्रकमधील चालक-वाहक अशा सहा जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. इथेनॉल टँकर पलटल्यामुळे करण्यात आलेल्या वाहतूक वळणादरम्यान हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर वाहतूक नियोजन आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे.

रविवारी मध्यरात्री विरुळ इंटरचेंजजवळ इथेनॉलने भरलेला टँकर पलटला. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव समृद्धी महामार्गावरील नागपूर मार्गिकेवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आणि वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याच दरम्यान मुंबई मार्गिकेवर कार आणि समोरून येणाऱ्या आयशर ट्रकमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि काही क्षणांतच भीषण आग लागली.

या अपघातात वर्ध्यातील सालोड हिरापूर येथील राजेश आनंदराव टिपले, त्यांची पत्नी सुषमा टिपले, २१ वर्षीय मुलगी जान्हवी टिपले आणि कार चालक अंकुश राऊत यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर आयशर ट्रक चालक संजय कुमार आणि वाहक समरजीत पाल यांचाही आगीत होरपळून मृत्यू झाला.

Advertisement

टिपले कुटुंब मुलीचा पुण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात प्रवेश करून गावाकडे परतत होते. आनंदाचा हा प्रवास समृद्धी महामार्गावर कायमचा थांबला.

अपघातानंतर रुग्णवाहिकेचे चालक परमेश्वर यांनी पोलिसांच्या मदतीने सर्वांना पुलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती सर्वांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संगीता कारखेले, एपीआय सरिता यादव, पीएसआय तोडसे आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्ग प्रशासनाने विरुळ इंटरचेंजजवळ पलटलेल्या इथेनॉल टँकरला हटविण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अग्निशमन दल, जिल्हा पोलीस आणि महामार्ग वाहतूक पोलिसांच्या देखरेखीखाली सुरू असल्याचे सांगितले आहे. प्रभावित भागातील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या दुर्घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वाहतूक वळविताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था होती का? सर्व इंटरचेंजवर वेळेत सूचना देण्यात आल्या होत्या का? या प्रश्नांची उत्तरे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहेत. सध्या मात्र या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.