Published On : Mon, Aug 26th, 2019

जागेच्या वादातून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सम्राट नगर परिसरात दिवसाढवळ्या एका तरुणाचा निर्घृण खून केल्याच्या घटनेला आठवडा लोटत नाही तोच जागेच्या वाद प्रकरणात कळमना रोड वरील सईद नगर समोरील बालाजी मंदिर जवळ दोन मारेकऱ्यांनी एका तरुणाच्या डाव्या मांडीवर जीवानिशी ठार करण्याच्या उद्देशाने चाकूने वार करून गंभीर जख्मि केल्याची घटना सायंकाळी 5 दरम्यान घडली असून जख्मि तरुणाचे नाव इमरान अन्सारी वय 32 वर्षे रा बी बी कॉलोनी कामठी असे आहे तर आरोपी मारेकऱ्यांचे नावे साजिद अखतर अन्सारी वय 30 वर्षे व रफिक वय 32 वर्षे असे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी नासिम अन्सारी हबीब रेहमान अन्सारी वय 45 वर्षे यांचा भाचा जख्मि इमरान अन्सारी यांच्या ताब्यातील असलेल्या जागेच्या वादावरून सदर नमूद आरोपींनि कळमना रोड वरील बालाजी मंदिर जवळ चाकूने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडताच जख्मि ला त्वरित नजीकच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले जखमींची परिस्थिती अजूनही नाजूक आहे यासंदर्भात फिर्यादी नासिम अन्सारी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून सदर दोन्ही आरोपी विरुद्ध भादवी कलम 307, 34 अनव्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement