– नागपूर सुधार प्रन्यासचा भूखंडधारकांना/गाळेधारकांना दिलासा

नागपूर: कोविड-१९ विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर नागपूर सुधार प्रन्यास येथे केवळ २५ टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालयीन कामकाज केले जात होते, यामुळे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे भूभाटकाचे (ग्राउंड डिमांड रेंट) मागणीपत्र काढण्यासाठी व ते संबंधित भूखंड धारकांना पाठविण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता होती.
कडक निर्बंधामुळे निर्माण झालेल्या या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नागपूर सुधार प्रन्यासने या बाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून भूखंडधारकांना दिलासा देण्यासाठी सर्व भूभाटकाची देय मुदत आता ३१ ऑगस्ट २१ पर्यंत वाढविण्यात आली आहे, त्यामुळे भूखंडधारकांना दिलासा मिळणार आहे.
दिलेल्या मुदतीत सर्व भूखंडधारकांनी त्यांच्या भूभाटकाची रक्कम जमा करावी, याबाबत १ जून मध्ये दर्शविलेली रक्कम भूखंडधारकाकडून/गाळेधारकाकडून ३१ ऑगस्ट २१ पर्यंत स्वीकारण्यात यावी याबाबत संबंधित सर्व युनियन बँक च्या सर्व शाखांना पत्र देण्यात आलेले आहे. ज्या भूखंडधारकांना मागणीपत्र प्राप्त झाले असतील त्यांनी नासुप्रच्या संबंधित विभागकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त करून घ्यावे सदर मुदतीत भूभाटकाच्या रकमेवर व्याज आकारले जाणार नाही.असे आव्हान नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...




