Published On : Tue, Aug 27th, 2019

डीसीपी निलोत्पल ने गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणास केले 2 वर्षासाठी हद्दपार

कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 हद्दीत येणाऱ्या जुनी कामठी पोलीस स्टेशन तसेच वाडी पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये गंभीर गुन्ह्याची नोंद असलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणास कित्येकदा समज देऊनही समजण्याच्या पलीकडे जाउन गुन्हेगारी वृत्तीत वाढ होताना दिसत असल्याने डीसीपी निलोत्पल यांच्या आदेशानव्ये सदर तरुणास नागपूर शहर तसेच नागपूर ग्रामीण येथील पोलीस स्टेशन मौदा, कन्हान, खापरखेडा, हद्दीतून 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असून हद्दपार झालेल्या तरुणाचे नाव फाजील अहमद फैयाज अहमद वय 26 वर्षे रा लकडगंज कामठी असे आहे .सदर हद्दपार झालेल्या तरुणास जिल्हा गोंदिया येथील चंगेरा येथील त्याच्या परिचित व्यक्तीकडे सोडण्यात आले.

ही हद्दपार कारवाही परिमंडळ क्र 5 चे पोलीस उपायुक्त निलोत्प ल, सहाययक पोलीस आयुक्त राजेश परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ जुनी कामठी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवोदास कठाळे, डी बी पथक चे किशोर गांजरे, विजय सिन्हा, रोशन पाटील, पवन गजभिये यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

संदीप कांबळे कामठी