Published On : Mon, Jun 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात डीसीपी दीपक अग्रवाल यांचे ‘ऑपरेशन क्लीन’; 13 धाडीत 15 आरोपींना अटक

Advertisement

नागपूर : नागपूर क्राइम ब्रँचच्या नव्या नेतृत्वाखाली शहरातील गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा बसला आहे. नुकतेच क्राइम ब्रँचचे उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारलेल्या आयपीएस अधिकारी दीपक अग्रवाल यांनी पदभार स्वीकारताच ‘ऑपरेशन क्लीन’ची मोहीम हाती घेत अवैध धंदे, दारू माफिया, वाहनचोर, शस्त्रबाज आणि काळाबाजार करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.

शनिवारी शहरातील विविध भागांत एकाच वेळी टाकलेल्या 13 ताबडतोब धाडीत 15 आरोपींना अटक करण्यात आली. गिट्टीखदान, नंदनवन, जरीपटका, सोनेगाव, पाचपावली, भांडेवाडी, सीताबर्डी, कोतवाली आणि सक्करदरा परिसरात झालेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.

Gold Rate
June 08 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 151,200 /-
Gold 22 KT ₹ 1,40,200 /-
Silver/Kg ₹ 2,42,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दारू तस्करीविरोधातील मोहिमेत सहा आरोपींना बेड्या ठोकत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात महुआ दारू, मद्यसाठा आणि रोख रक्कम जप्त केली. अनेक अवैध दारू अड्ड्यांवरही हातोडा पडला.

वाहन आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत क्राइम ब्रँचने एका अल्पवयीनासह पाच आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या दुचाकी आणि महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले.

सीताबर्डी आणि कोतवाली परिसरात धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या दोन संशयितांना पकडण्यात आले, तर गांजाचे सेवन करणाऱ्या एका युवकावर एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

सक्करदरा परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर व्यावसायिक वापर करणाऱ्यांवरही पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात सिलेंडर, सिगड्या आणि अन्य साहित्य जप्त केले.

विशेष म्हणजे, या मोहिमेदरम्यान मारामारी, दंगल आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 34 सराईत गुन्हेगारांची चौकशी व पडताळणी करण्यात आली. संशयितांवर पोलिसांची करडी नजर असून त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

डीसीपी दीपक अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील या पहिल्याच मोठ्या कारवाईने नागपुरातील गुन्हेगारांना स्पष्ट संदेश दिला आहे. गुन्हेगारीला थारा नाही. क्राइम ब्रँचचे ‘ऑपरेशन क्लीन’ आता आणखी आक्रमक होणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges