Published On : Fri, Apr 2nd, 2021

पाचपावली येथे डीसीएचसी सुरु महापौरांनी केले उदघाटन

नागपूर : महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ केयर सेंटर (DCHC) पाचपावली चे उदघाटन केले. या सेंटरमध्ये ७२ खाटांची व्यवस्था कोव्हिड रुग्णांसाठी केली आहे.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मधले कोरोना रुग्ण स्थिर झाल्यानंतर इथे स्थानांतरित करण्यात येणार आहे. त्यांचेसाठी ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात आली आहे.

इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये ११०, आयुष येथे ४०, आयसोलेशन येथे ३२ कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांना स्थिर झाल्यानंतर येथे स्थानांतरित करण्यात येईल.

डॉ.सिद्दीकी यांचे मेडिकल सर्विसेस सोसायटीचे सहकार्य या केन्द्रात मिळत आहे. मनपा तर्फे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्सेसची व्यवस्था करण्यात आली आहे. महापौरांनी रेमडीसीवर इंजेक्शन घेण्यासाठी येणारे कोव्हिड रुग्णांसाठी सुध्दा खाटांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ.मीनाक्षी सिंग उपस्थित होते.