Published On : Sat, Sep 5th, 2020

नवे ३१ रुग्णालये होणार डीसीएच

Advertisement

मनपाने आदेश काढून मागविला अहवाल


नागपूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपुरात पुन्हा नव्याने ३१ नियमित रुग्णालये आता डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पीटलमध्ये परीवर्तीत होणार आहे. यासंदर्भातील एक आदेश नागपूर महानगरपालिकेने निर्गमित केला असून २४ तासांत संबंधित रुग्णालयांकडून सदर रुग्णालय कोव्हिड रुग्ण दाखल करून सज्ज असल्याबाबतचा अहवाल मागविला आहे. आता डीसीएच रुग्णालयांची संख्या एकुण ६२ झाली आहे.

या आदेशात नमूद केल्यानुसार, २४ तासात रुग्णालयांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील ४८ तासात कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण संबंधित रुग्णालयांना भरती करता येतील. जे रुग्ण दाखल होतील त्यांच्यावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार करण्यात यावा, असेही आदेशात नमूद आहे. दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचा रिअल टाईम अहवाल मनपाच्या पोर्टलवर नियमित अद्यावत करणे अनिवार्य राहील.

Gold Rate
25 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,25,300 /-
Gold 22 KT ₹ 1,16,500 /-
Silver/Kg ₹ 1,57,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही रुग्णालये राहतील नवे डीसीएच
जी रुग्णालये आता पूर्णत: कोव्हिड रुग्णालय होणार आहेत, त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटर ऑटोमोटिव्ह चौक, श्रीमती निंबुनाबाई तिरपुडे हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर चॉक्स कॉलनी कामठी रोड, अवंती इंस्टिट्युट ऑफ कॉर्डिऑलॉजी प्रा.लि. धंतोली, म्यूर मेमोरियल हॉस्पीटल सीताबर्डी, व्हिनस क्रिटीकल केअर हॉस्पीटल १० नंबर पूल कामठी रोड, शतायु हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर हितवादजवळ वर्धा रोड, क्रिसेंट हॉस्पीटल ॲण्ड हार्ट सेंटर लोकमत चौक धंतोली, डॉ. दळवी चिल्ड्रन हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर गरोबा मैदान, मिडास मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल प्रा.लि. रामदासपेठ, अर्नेजा इंस्टिट्यूट ऑफ कॉर्डिऑलॉजी रामदासपेठ, ट्रीट मी हॉस्पीटल हिंदुस्थान कॉलनी वर्धा रोड, श्री हॉस्पीटल ॲण्ड क्रिटीकल केअर सेंटर, सक्करदरा, प्लॅटिना हार्ट हॉस्पीटल हॉटेल हरदेवजवळ सीताबर्डी, खिदमत हॉस्पीटल शांतीनगर, स्पंदन हार्ट इंस्टिट्यूट ॲण्ड रिसचर सेंटर (इंडिया) प्रा.लि. धंतोली, क्रिटीकेअर हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर सीताबर्डी, सनफ्लॉवर हॉस्पीटल रामदासपेठ, अश्विनी किडनी ॲण्ड डायलेसीस सेंटर रामदासपेठ, शेंबेकर हॉस्पीटल प्रा.लि. अजनी चौक खामला रोड, ट्रिनीट हॉस्पीटल हिंदुस्थान कॉलनी वर्धा रोड, क्रिटीकल केअर युनीट हिंदुस्थान कॉलनी वर्धा रोड, गिल्लुरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल रेशीमबाग उमरेड रोड, गेटवेल हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च इंस्टिट्यूट धंतोली, क्रिम्स हॉस्पीटल रामदासपेठ, आयकॉन हास्पीटल भरत नगर अमरावती रोड, सेनगुप्ता हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च इंस्टिट्यूट रवीनगर चौक, शुअरटेक हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर लि. धंतोली, आनंद हॉस्पीटल हनुमान नगर, केशव हॉस्पीटल मानेवाडा चौक, आस्था क्रिटीकल केअर ॲण्ड अवतार मेहरबाबा हॉस्पीटल सुयोग नगर नागपूर.

Advertisement
Advertisement