Published On : Fri, Jul 26th, 2024
By Nagpur Today Nagpur News

दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ परावैद्यक परिषदेद्वारे नव्या २९ अभ्यासक्रमांना मान्यता

Advertisement

वर्धा – दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठातील स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेसअंतर्गत कार्यान्वित २९ पॅरा मेडिकल म्हणजेच परावैद्यकीय अभ्यासक्रमांना राज्य शासनाच्या महाराष्ट्र परावैद्यक परिषद, मुंबईद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र परावैद्यक परिषद अधिनियम २०११ नुसार शासन निर्णयांतर्गत जोडलेल्या अनुसूचीनुसार बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी (बीपीएमटी) विद्याशाखेत बायोमेडिकल सायन्सेस (सेल जेनेटिक्स), ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर तंत्रज्ञान (इमर्जन्सी टेक्नॉलॉजिस्ट), इंटेन्सिव्ह केअर टेक्नॉलॉजी, ऑर्थोपेडिक टेक्नॉलॉजी (ॲडव्हान्स केअर), क्लिनिकल न्यूट्रीशन अँड डायटेटीक्स, एमआयआर (रेडिओलॉजी आणि इमेजिंग टेक्नॉलॉजिस्ट, डायग्नोस्टिक मेडिकल रेडिओग्राफर, कॉम्प्युटेड टोमोग्राफी सीटी, मॅमोग्राफर), ऑप्टोमेट्री (नेत्ररोग सहायक), ब्लड बँक टेक्नॉलॉजी (मेडिकल लॅब तंत्रज्ञ), हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, फिजिशियन असिस्टंट, रेस्पिरेटरी टेक्नॉलॉजी, न्यूरोसायन्स टेक्नॉलॉजी, न्यूरो इलेक्ट्रो फिजिओलॉजी (ईईजी, ईएनडी, ईएमजी), डायलिसिस थेरपी टेक्नॉलॉजी (यूरोलॉजी टेक्नॉलॉजिस्ट), जेरियाट्रिक केअर, हेल्थ एज्युकेटर अँड काऊन्सिलर (डायबिटीज, लॅक्टेशन) आणि बायोमेडिकल सायन्सेस (मेडिकल इक्विपमेंट टेक्नॉलॉजी) या पदवी अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे.

Today’s Rate
Tue14 Oct. 2024
Gold 24 KT 76,000 /-
Gold 22 KT 70,700 /-
Silver / Kg 90,500 /-
Platinum 44000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तर एम.एस्सी. अभ्यासक्रमात मानवी अनुवांशिक (पेशी अनुवंशशास्त्रज्ञ), कर्करोग जीवशास्त्र, क्लिनिकल एम्ब्र्योलॉजी (भ्रूणविज्ञान), ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर टेक्नॉलॉजी (इमर्जन्सी मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट), ऑप्टोमेट्री (नेत्ररोग सहायक), रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी (रेडिओलॉजी आणि इमेजिंग टेक्नॉलॉजिस्ट), एमएलटी (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट), डायलिसिस थेरपी (यूरोलॉजी टेक्नॉलॉजिस्ट), क्लिनिकल सायकोलॉजी (मनोआरोग्य सहायक) आणि श्वसन तंत्रज्ञान (रेस्पिरेटरी टेक्नॉलॉजिस्ट) या स्नातकोत्तर अभ्यासक्रमांना महाराष्ट्र परावैद्यक परिषद, मुंबईद्वारे मान्यता प्राप्त झाली आहे.

Advertisement

या परावैद्यक शाखेतील १९ पदवी आणि १० पदव्युत्तर अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराची शाश्वती देणारी संधी उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र परावैद्यक परिषद अधिनियम २०११ सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करून सुधारणा करण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिवांना देण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाला प्राप्त झाली असल्याचे अभिमत विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर व स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेसचे अधिष्ठाता डॉ. सुनील तितने यांनी सांगितले.