Published On : Mon, Sep 2nd, 2019

नेरी गावातील जुगार अड्यावर धाड,

9 जुगाऱ्याना अटक, 86 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी :-नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील नेरी गावातील संतोषी माता मंदिरासमोरील मोकळ्या जागेत अवैधरीत्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलीस स्टेशन च्या गुन्हे प्रगटीकरण विभाग च्या दुबे पथक ला यशप्राप्त झाल्याची कारवाही काल 1 सप्टें.ला सायंकाळी साडे पाच दरम्यान केली असून या धाडीतून 9 जुगाऱ्याना ताब्यात घेत त्यांच्याकडील असलेले वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे असलेले 8 मोबाईल किमती 79 हजार रुपये व नगदी 7910 रुपये व 52 तास पत्ते असा एकूण 86 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यात घेतलेल्या नऊही जुगाऱ्यावर कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी मध्ये प्रवीण निकाळजे वय 21 वर्षे लिहिगाव, अमन बोरकर वय 23 वर्षे रा लिहिगाव, सचिन काकूनिया वय 29 वर्षे रा आजनी, राजेश उर्फ गोलू बिसेन वय 31 वर्षे रा नेरी, दुर्गेश वंजारी वय 22 वर्षे रा नेरी, देविदास ठाकरे वय 26 वर्षे रा नेरी, नीरज ढोले वय 25 वर्षे रा ओंमनगर सक्करदरा नागपूर, ओमप्रकाश भोयर वय 30 वर्षे रा उनगाव, वासुदेव गोंडाने वय 42 वर्षे रा उनगाव कामठी चा समावेश आहे

ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल व एसीपी राजेश परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ .व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक विनोद धोंगडे, डी बी पथकातील ज्ञानचंद दुबे, दिलीप कुमरे,प्रमोद वाघ, वेदप्रकाश यादव, मंगेश गिरी,ललित शेंडे, राहूल ठाकूर, श्रीकांत भिष्णुरकर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी