| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jun 1st, 2020

  वादळी वारा-पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करावे : बावनकुळे

  नागपूर : रविवार दिनांक 31 मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे जे नुकसान झाले आहे, त्या नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

  या पावसामुळे भाजीपाल्याचे व अन्य पिकांचे शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे. तसेच ग्रामीण भागातील गरीबांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.

  घरावरील टीन उडून गेले. कामठी, मौदा, नागपूर ग्रामीण व अन्य जिल्ह्यातही या वादळी पावसामुळे लोकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण प्रशासनाने त्वरित करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145