Published On : Tue, Sep 18th, 2018

महाराष्ट्राची आर्थिक,सामाजिक परिस्थिती सुधारु दे;लालबागच्या राजाकडे दादा-ताईंचे साकडे…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्राची आर्थिक,सामाजिक परिस्थिती सुधारु दे असे साकडे लालबागचा राजाला घातले. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर सिध्दीविनायकाचेही दर्शन घेतले.

Advertisement

Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय भावंडे अशी ओळख असलेले विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सहकुटुंब मुंबईतील लालबागचा राजा आणि सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे उपस्थित होते.

Advertisement

अजितदादा आणि सुप्रियाताई यांनी राज्य आज आर्थिक संकटात आले आहे, महागाई वाढली आहे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. बलात्कार,महिला अत्याचाराचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात रोज नवीन भ्रष्टाचार बाहेर येत आहेत अशा परिस्थितीत राज्याला सावरण्याची गरज आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातली परिस्थिती नीटनेटकी होवो अशी प्रार्थना राज्यातील जनतेच्या वतीने केली.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement