Published On : Sat, Oct 12th, 2019

अवैध सुगंधित तंबाकू तस्कर बाजावर धाड, 1 लक्ष 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी :-संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले सुगंधित तंबाकू ची अवैधरित्या खेप साठवून हे सुगंधित तंबाकू अवैधरीत्या विकण्याकरिता वाहन क्र एम एच 33 -2904 ने तस्करी करण्यासाठी कळमना हुन कामठी कडे येत असल्याची गुप्त माहिती एसीपी राजरतन बन्सोड यांच्या कार्यालयात मिळाली असता मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे एसीपी कार्यालयातील राशीद शेख, बिट मार्शल संदेश शुक्ला, पंकज गुप्तां यांनी सकाळी 8 वाजता कामठी कळमना रोड वरील लाईफ लाईन हॉस्पिटल समोर सदर वाहनास थांबवून त्या वाहनावर धाड घातले असता वाहनात खाजगी साहित्यासह सुगंधित तंबाकू दिसून आल्याने पोलिसानी सदर वाहन ताब्यात घेत तस्करबाजावर कारवाही करोत

या कारवाहितुन जनम नामक 500 ग्राम प्रति पॅकेट सुगंधित तंबाकू 250 रुपये किमतीं प्रमाणे 80 पॅकेट किमती 20 हजार रुपये व वाहन किंमत दीड लक्ष रुपये असा एकूण 1 लक्ष 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची यशस्वी कारवाही सकाळी 8 वाजता करन्यात आली.तसेच जप्त माल असलेला सुगंधित तंबाकू हा अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.यातील ताब्यात घेण्यात आलेल्या तस्कर बाज आरोपी चे नाव मुकेश कुमार सोनी वय 42 वर्षे रा शांती नगर नागपूर असे आहे.

ही यशस्वी कारवाही एसीपी राजरतन बन्सोड यांच्या मार्गदर्शनार्थ रशीद शेख, संदेश शुक्ला, पंकज गुप्तां यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे


संदीप कांबळे कामठी