Published On : Wed, Jun 25th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात क्राईम ब्रँचच्या वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई; एकाला अटक,तीन गुन्ह्यांचा उलगडा

Advertisement

नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने एक मोठी कारवाई करत गुप्त माहितीच्या आधारे एका सिरीयल चोरट्याला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरलेली दुचाकी, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सागर उर्फ भांजा अशोक वर्मा असून तो विजय नगर परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांना आरोपीविरोधात गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.

१४ जून रोजी अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाची होंडा शाईन दुचाकी घरासमोरून चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता सागर याच्या गुन्ह्यातील सहभागाची माहिती पुढे आली.सखोल चौकशीत त्याने केवळ दुचाकीच चोरी केली नसून, कलमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटनाही केल्याची कबुली दिली.

आरोपीकडून पोलिसांनी होंडा शाईन दुचाकी, एक सोन्याचा लॉकेट, ७० हजार रुपये रोख रक्कम आणि आणखी एक लॉकेट असा एकूण १ लाख ५२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला संबंधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.