नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करत दावा केला की, गेल्या ११ वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी लागू आहे. भाजपने आणीबाणीच्या पन्नास वर्षांच्या निमित्ताने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली असली, तरी खरगेंनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या भूमिकेवर कडाडून टीका केली.
“ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नाही, ज्यांनी संविधान रचनेत सहभाग घेतला नाही, ते आज संविधान वाचवण्याच्या आंदोलनाला घाबरत आहेत,” असा टोला खरगेंनी लगावला. त्यांनी म्हटले की, जे कोणी सरकारविरोधात किंवा जनहितात बोलतात त्यांना देशद्रोही ठरवले जाते, विद्यार्थ्यांपासून पत्रकारांपर्यंत सर्वांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
खरगे म्हणाले, “मोदी सरकारमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपले आहे. पत्रकार काही लिहितो तर तुरुंगात टाकला जातो. मासिके सरकारवर टीका करतात म्हणून त्यांना बंद करण्यात येते. केवळ भाषणांनी पोट भरत नाही, लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज महत्त्वाचा आहे.”
मोदी ट्रम्पला घाबरतात –
खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना म्हटले की, “ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या १७ वेळा सांगितले की त्यांनी भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबवले, पण मोदींनी यावर एकही शब्द काढला नाही. मोदी ट्रम्पला घाबरतात, पण स्वतःला ‘विश्वगुरू’ म्हणवतात.”
भाजप सरकार उद्योगपतींच्या बाजूने –
खरगेंनी आरोप केला की, भाजप सरकारने सर्व धोरणे काही मोजक्या उद्योगपतींना फायद्याच्या ठरणाऱ्या पद्धतीने आखली आहेत. “गरिबांना अधिक गरीब आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्याचं काम सुरू आहे. देशातील संपत्ती निवडक मित्रांना सोपवली जात आहे,” असं ते म्हणाले.
मोदींना लोकांच्या प्रश्नांशी देणं-घेणं नाही-
खरगेंनी केंद्र सरकारवर काश्मीरमधील पहलगाम घटनेप्रकरणी गंभीर आरोप करत सांगितले की, या घटनेनंतर काँग्रेसने विशेष संसद अधिवेशन आणि सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली होती. “पण पंतप्रधानांनी ती बैठक टाळली आणि प्रचारासाठी बाहेरगावी गेले. देशभक्तीच्या गोंधळात खऱ्या प्रश्नांवर गप्प राहणं हीच मोदींची शैली आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
राहुल गांधींच्या संविधान यात्रेची भाजपला भीती-
राहुल गांधी यांच्या संविधान वाचवा यात्रेमुळे देशभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकार जनतेचं लक्ष भरकटवण्यासाठी मुद्दामहून आणीबाणीचा मुद्दा उगाळत असल्याचा आरोपही खरगेंनी केला.
RTMNU के परीक्षा सिस्टम पर फिर उठे सवाल; एडमिट कार्ड में गलत...
संविधान चौक पर सीजेपी का प्रदर्शन #nagpurnews #cockroachjanatapartyprotest #latestnews #newsupdate
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 16 JUNE 2026 #news...
अजनी में युवक से 4 लाख अधिक की लूट.. #crime #nagpurnews #accusedarrest...
टिमकी चीमाबाई पेठ में 6 घरों में चोरी.. #crime #nagpurnews #accusedarrest #latestnews
16 नगरसेवकों ने गुटनेता बदलने की मांग ... #latestnews #politicsnews #maharashtranews #maharashtra








