Published On : Wed, Sep 15th, 2021
By Nagpur Today Nagpur News

गुरुवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

Advertisement

India crosses 75 cr Covid vaccine doses: Govt

नागपुर: राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर गुरुवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे.

या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज घेण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल, ही माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. तसेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षावरील व ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचे कोव्हिशिल्डचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजे पर्यत होईल, ही माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी दिली.

तसेच १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय,कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय, इमामवाडा, इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, मनपा स्त्री रुग्णालय, पाचपावली, प्रगती हाल, दिघोरी येथे उपलब्ध आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.