Published On : Mon, Jan 17th, 2022

गुड न्यूज! १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही देणार करोनावरील लस, वाचा कधीपासून

Advertisement

नवी दिल्ली : देशात करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असताना एक चांगली ( covid vaccination for children in india ) बातमी आली आहे. आता लवकरच १२ ते १४ वर्षांच्या मुलांनाही करोनावरील ही लस मिळणार आहे. येत्या मार्चपासून १२ त १४ वर्षे वयोगटातील मुलांना करोनावरील लस दिली जाईल, अशी माहिती NTAGI ग्रुपचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली. देशात सध्या १५ ते १७ वर्षांदरम्यानच्या मुलांना करोनाची लस दिली जात आहे.

आतापर्यंत १५ ते १७ वर्षे वयोगटातील ३ कोटीहून अधिक मुलांना देशात करोनावरील लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर अवघ्या १३ दिवसांत या वयातील सुमारे ४५ टक्के मुलांना ही लस देण्यात आली आहे. ३ जानेवारीपासून १५ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले होते, असे अरोरा यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement

‘जानेवारीच्या अखेरीस १५ ते १७ वर्षे वयोगटातील ७.४ कोटी मुलांना करोना लसीचा पहिला डोस मिळेल. यानंतर, फेब्रुवारीच्या सुरवातीपासून आम्ही या मुलांना दुसरा डोस देण्यास सुरवात करू आणि महिन्याच्या अखेरीस प्रत्येकाला लसीचा दुसरा डोस मिळेल. त्यानंतर आम्ही फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरवातीपासून १२ ते १४ वर्षांदरम्यानच्या मुलांना लस देणे सुरू करू शकतो, असे अरोरा म्हणाले.

१२ ते १७ वर्षे वयोगटातील मुले प्रौढांप्रमाणेच असतात, असे तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे सर्वप्रथम १५ ते १७ वयोगटातील किशोरवयीन मुलांना ही लस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अरोरा यांनी सांगितले. त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर या वयाखालील मुलांचे लसीकरण सुरू केले जाईल.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement