| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, May 11th, 2021

  एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आता RT-PCR टेस्ट आवश्यक नाही

  5 दिवस ताप न आल्यास टेस्टशिवाय डिस्चार्ज

  देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटे दरम्यान 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात नवीन प्रकरणे कमी होत आहेत. यामुळे केंद्र सरकारने नियमांमध्ये शिथिलता देणे सुरू केले आहे. मंगळवारी सरकारने टेस्टिंगशी संबंधित काही नियमांमध्ये बदल केले आहेत.

  नवीन बदलानुसार, आता एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्यापूर्वी RT-PCR टेस्ट करणे आवश्यक नाही. यापूर्वी अनेक राज्यात प्रवेश करण्यापूर्वी कोरोना टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत असणे आवश्यक होते. याशिवाय नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार जर रुग्णाला 5 दिवस ताप येत नसेल तर रुग्णालयातून डिस्चार्ज होण्यापूर्वी त्याला आरटी-पीसीआर टेस्ट करण्याची गरज भासणार नाही.

  महाराष्ट्र आणि यूपीसह 18 राज्यांमध्ये प्रकरणे कमी झाली आहेत
  आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाची स्थितीचीही माहिती दिली. त्यानुसार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा, चंदीगड, लडाख, दमण आणि दीव, लक्षद्वीप आणि अंदमान येथे दररोज नवीन कोरोना केसेस कमी होत आहेत.

  परंतु, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, आसाम, जम्मू-काश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेश, पुडुचेरी, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशात कोरोना केसेस वाढल्याचे दिसून येत आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145