Published On : Tue, May 11th, 2021

अग्रेसर फाउंडेशन तर्फे रक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजित करण्यात आले.

कोरोना आणि त्याची अत्यंत आगी सारखी पसरत जानारी भिती या सगळीकडे दुर्लक्ष करून नागपुरची एक स्वयंसेवी संस्था अग्रेसर फाउंडेशन नी कोरोनाची भिती न बाळगता समाजाला आणि लोकांना मदत म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

कोरोनाच्या भिती पोटी सहसा लोक रक्तदान करायला घाबरत आहे अग्रेसर फाउंडेशन ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर मध्ये ३६ युनिट रक्त साठवण्यात आले. जास्ती कुठलाच प्रचार प्रसार न करता देखील ३६ लोकांनी रक्तदान केले.

आज या कोरोना काळात प्लाझ्माची अत्यंत गरज भासत आहे ते ध्यानी ठेवुन ४३ लोकांनी प्लाझ्मा दानसाठी कर्ज केला त्यातुन ९ लोकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. अग्रेसर फाउंडेशन ने सतत समाजाकरीता अनेक योगदान दिले आहे आणि पुढेही देत रहाणार. कोरोनाच्या अत्यंत गंभीर परिस्थिती मध्ये देखील सतत समाजकार्य सुरू आहे म्हंटल्यावर अग्रेसर फाउंडेशनचे कार्य प्रशंसनीय आहे.