Published On : Tue, Aug 11th, 2020

30 सेकंदात परिसर होणार कोरोना मुक्त

Advertisement

– अत्युल्य मायक्रोवेव्ह चे माननीय केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांचे हस्ते लोकार्पण, खासदार पदमश्री डॉ. विकास महात्मे यांचा पुढाकार

नागपुर– आता कुठलाही परिसर, पृष्ठभाग, वस्तू, घरातील, ऑफिस मधील फर्निचर, बेड ई. सर्वच केवळ 30 सेकंदात कोरोना आणि इतर व्हायरस मुक्त तसेच बॅक्टेरिया मुक्त केल्या जाऊ शकेल. ‘मेसर टेक्नोलॉजी’ द्वारा निर्मित, ‘अतूल्य मायक्रोवेव्ह’ हे जगातील पहिले हाती धरून वापरता येणारे उपकरण आहे जे मायक्रोवेव्ह द्वारे तात्काळ निर्जंतुकीकरण करू शकेल. राष्ट्रीय संस्था DRDO द्वारा प्रमाणित तसेच फ्रांस व अमेरिकेच्या निकषांवर आधारित असे हे उपकरण 100 टक्के भारतीय बनावटीचे असून MSME अंतर्गत बनविले आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्य म्हणजे ही यंत्रणा मानवासाठी अगदी सुरक्षित असून अल्ट्राव्हायोलेट किरणांसारखे याचे दुष्परिणाम नाहीत. तसेच ‘अतुल्य’ मध्ये पाणी अथवा रसायनांचा वापर नाही त्यामुळे अतिशय सोयीस्कर व टिकावू आहे. या उपकरणा द्वारे 5 मीटर पर्यंतचा परिसर, पृष्ठभाग, वस्तू , इतकेच नव्हे तर खोके आणि डब्यांच्या आतील वस्तू देखील निर्जंतुक करता येऊ शकतात.

हे उपकरण बनवतांना खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी पुढाकार घेतला व सल्लागार म्हणून काम केले. मेसर टेक्नोलॉजी चे श्री मोनिष भंडारी व त्यांच्या चमूने संशोधन करून हे उपकरण बनविले. मा.श्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, परिवहन, महामार्ग, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्यम विभाग भारत सरकार यांनी हे उपकरण आज लोकार्पण केले. त्यावेळी खा.डॉ.विकास महात्मे , शिवानी दाणी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement