Published On : Sat, May 1st, 2021

ऑक्सिजनची कमतरता व सौम्य लक्षणे असणा-या रुग्णांसाठी कोवीड केअर सेंटर सुविधा लाभदायक

– केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग तसेच केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मेघे ग्रुप द्वारे संचालित नेल्सन हॉस्पिटलतर्फे कोवीड केअर सेंटरच उद्‌घाटन संपन्न

नागपुर: ज्या कोविडच्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता आहे आणि सौम्य लक्षणे आहेत अशा रुग्णांना विलगीकरणाकरिता सुविधेची गरज भासते. ती सुविधा मेघे ग्रुपद्वारे संचालित नेल्सन हॉस्पिटलतर्फे नागपूरातील वर्धा रोड स्थित प्राईड हॉटेल येथे कोवीड केअर सेंटरच्या रुपाने उपलब्ध आहे आणि ही सुविधा रुग़्णांना निश्चितच लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग तसेच केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी यांनी केले. सदर सुविधेचे उद्घाटन आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते . यावेळी हिंग़ण्याचे आमदार समीर मेघे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

वर्धा येथील प्रकल्पात रेमडेसीवीरच्या 30,000 इंजेक्शन प्रति दिवस निर्मिती झाल्यानंतर सात ते आठ दिवसात त्याचे परीक्षण झाल्यानंतर सर्व विदर्भात त्याचे वितरण होईल अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली. माजी खासदार दत्ता मेघे यांच्या पुढाकाराने हिंगणा तसेच सावंगी मेघे येथील हॉस्पिटल मुळे रुग्णांची सोय होत आहे. ग्रामीण भागातील तसेच तालुक्यातील रुग्णांची सोय व्हावी याकरिता ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देखील पुरवण्यात येत आहे. नागपूरात ऑक्सिजनची संभाव्य कमतरता लक्षात घेता सीएसआर निधीतून पाच हॉस्पीटलला ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प स्थापन करण्यासाठी जमीन देण्यात आली आहे . या प्रमाणेच 50 बेड पेक्षा जास्त संख्या असणाऱ्या सर्व हॉस्पीटलने हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही गडकरी यांनी केलं.

सकारात्मकता आणि आत्मविश्वास या संकटकाळात बाळगणे आवश्‍यक आहे . याच बळावर आपण या रोगावर मात करू शकतो. वैद्यकीय तसेच निमवैद्यकीय कर्मचारी, पोलीस , सफाई कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत त्यांच्या आरोग्याची निगा राखणे आपले कर्तव्य असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. मेघे ग्रुपच्या वतीने संचालित नेल्सन हॉस्पिटल येथे 127 बेड असून या कोवीड केअर सेंटर मध्ये आरामदायक कक्ष, वैद्यकीय कीटस्‌ , डॉक्टर तसेच नर्सिंग स्टाफ, ऑक्सिजनची सुविधा, कार्डियाक ॲम्बुलन्स तसेच योगाभ्यास , फिजिओथेरीपी अशा सुविधा उपलब्ध आहेत . ऑक्सिजन पातळी 90 पेक्षा जास्त आहे आणि एच आर सिटी स्कोर १० पेक्षा कमी आहे अशा रुग्णांना येथे प्रवेश दिला जाणार आहे.


रुग्णवाहिका वितरण
या कार्यक्रमाच्या आधी गडकरींच्या नागपूर निवासस्थानी राष्ट्रीय महामार्ग व संरचना विकास निगम लिमिटेड या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधीन संस्थेने विदर्भातील 7 संस्थांना ऑक्सिजन सुविधेसह 7 रुग्णवाहिका वितरित केल्या. यामध्ये गडचिरोली , अहेरी व अमरावतीच्या मेलघाट सारखे दुर्गम क्षेत्रातील संस्थाचा समावेश आहे .

सीएसआर फंडातून अमरावती येथील पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज येथे 20 व्हेंटिलेटर तसेच अमरावती महानगरपालिकेला १० मिनी व्हेंटिलेटर वितरित करण्याचा कार्यक्रम यावेळी झाला.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement