Published On : Mon, Apr 12th, 2021

कोव्हिड बेडस ची माहिती आता एका क्लिकवर

नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने सॉफ्टवेयर जनतेच्या सेवेत

 

Advertisement

 

नागपूर, :  नागपूर शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. कोरोना बाधितांचा वाढता प्रभाव लक्षात घेता शहरातील विविध खाजगी व शासकीय रुग्णालय मिळून बाधितांसाठी किती बेडस उपलब्ध आहे याची माहिती देण्यासाठी नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेड च्या वतीने सॉफ्टवेयर तयार केला आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर उपलब्ध आई.सी.यू. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर, खाटांची माहिती प्राप्त होईल. या सोयीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी व्यक्त केला.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा व  नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनात नागपूर स्मार्ट सिटी च्या ई-गर्व्हनेंस विभागाने कोव्हिड बेड ची उपलब्धता दाखविणारा साफ्टवेयर तयार केला आहे. नागपूरात सध्यास्थितीत १०७ रुग्णालयांमध्ये बेडसची उपलब्धता दर्शविली जात आहे. ऑक्सीजन बेड, आई.सी.यू. बेड, व्हेंटीलेटर बेडस चा तक्ता दर्शविणारा हा सॉफ्टवेयर नागरिकांना त्यांचे निकटवर्तीयांसाठी मोठा आधार ठरेल. रुग्णालयांना सॉफ्टवेयरचे लॉगिन आई डी देण्यात आले आहे. रुग्णालयाचे ऑपरेटरला नवीन पेशंट आला किंवा बेड रिकामा झाला याची माहिती या साफ्टवेयरवर अपडेट करायची आहे.

 

ही माहिती नागरिकांसाठी डॅशबोर्ड वर रीयल टाईम दाखविली जाईल. संबंधीत व्यक्ती आपल्या गरजेनुसार रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांना दाखल करु शकतो. महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी या उपयुक्त कार्यासाठी स्मार्ट सिटीचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सांगितले की पालकमंत्री श्री नितीन राऊत यांच्या बैठकीत कोविड खाटांची माहिती नागरिकांना द्यावी पण ती माहिती वेळोवेळी  यथोचित तंत्रज्ञानाचा वापर करून ऑन टिप दयावी, अशी  माझी सूचना होती. तसेच मनपा च्या बैठकीत सुद्धा सत्ता पक्ष नेता श्री अविनाश ठाकरे यांना यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले होते.

त्यांनी सांगितले की रुग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत असून अश्या गंभीर परिस्थितिमध्ये नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांसाठी कोणत्या रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध आहे, याची रीयल टाईम माहिती मिळेल. नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

या उपलब्धिबद्दल  श्रीमती भुवनेश्वरी एस. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्मार्ट सिटीच्या ई-गर्व्हनेन्स टीम चे प्रोग्रामर श्री अनूप लाहोटी यांचे सॉफ्टवेयर तयार करण्याकरीता अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की नागपूर महानगरपालिका www.nmcnagpur.gov.in व नागपूर स्मार्ट सिटी च्या संकेत स्थळ http://nsscdcl.org/covidbeds वर क्लिक करुन माहिती घेता येईल. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement