Published On : Mon, Feb 12th, 2018

गडचिरोली जिल्ह्यातील माॅडेल स्कूल सुरू करा-उच्च न्यायालयाचे आदेश

Advertisement

गडचिरोली जिल्हयातील बंद करण्यात आलेले पाचही माॅडेल स्कूल जून 2018 पर्यंत सुरू करावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपिठाने राज्य व केंद्र शासनाला दिले आहे. श्रमिक एल्गारने दाखल केलेल्या रिट याचिकेवर न्यायमुर्ती बी.पी. धर्माधिकारी व न्यायमुर्ती श्रीमती. सपना जोशी यांचे खंडपिठाने हे आदेश दिलेत.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अमंलबजावणी करावी अशी मागणी आज श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे केली आहे.

बंद केलेल्या माॅडेल स्कूल पुर्ववत सुरू करून, या विद्याथ्र्यांना 12 वी पर्यंत शिक्षण द्यावे व त्यासाठी आवश्यक मदत द्यावी. असेही आदेशात नमुद केले आहे.

Gold Rate
06 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,52,500 /-
Gold 22 KT ₹ 1,41,800 /-
Silver/Kg ₹ 2,42 300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मागासलेल्या भागातील मुलांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यासाठी सन 2012-13 पासून केंद्र सरकारचे मदतीने राज्यशासनाने ‘‘माॅडेल स्कूल’’ सुरू केले. यात गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, मोहाली (धानोरा) येथे या शाळा सुरू केल्या. दर्जेदार शिक्षण मिळत असल्यांने दूरवरून विद्यार्थी या शाळेत दाखल होत होते. या शाळेसाठी इमारती व वस्तीगृह बांधण्याकरीता निधी मंजूर होवून, जागाही अधिग्रहीत करण्यात आली होती. मात्र 2016 पासून केंद्र सरकारने निधी बंद केल्याचे कारणावरून, या शाळा बंद करण्यात आल्या. शाळा बंद झाल्यांने विद्यार्थी आणि पालकांनी जिल्ह्यात मोठे आंदोलन केले. जिल्हा प्रशासनानेही या शाळा सुरू ठेवण्याबाबत सकारात्मक अहवाल दिला होता, मात्र राज्य शासनाने नकारात्मक भूमिका घेत शाळा बंद केल्या.

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल व नक्षल प्रभावीत जिल्हा असून, या जिल्ह्यात ग्रामिण भागात एकही इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्यांने विशेष बाब म्हणून जिल्ह्यातील या शाळा बंद करू नये अशी मागणी श्रमिक एल्गारने केली होती. यासाठी श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात राज्यपाल सि. विद्यासागरराव यांची राजभवनावर पालकांना घेवून भेट घेतली होती. मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांचेकडेही मागणी करण्यात आली. राज्याचे वित्त व वनमंत्री नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कक्षात यासाठी बैठकही झाली मात्र शिक्षण विभागाने या शाळा सुरू करण्यास नकार दिल्यांने श्रमिक एल्गारने या प्रकरणात उच्च न्यायालयात दाद मागीतली.

अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे मार्गदर्शनात धानोराचे सिताराम बदाडे, मोहालीच्या भागरथाबाई गावडे, अल्लापल्ली येथील सरीता मडावी, बंदुकपल्लीचे विमल मडावी, पुनूरचे चामई डुग्गा आणि श्रमिक एल्गारचे वतीने तत्कालीन महासचिव विजय कोरेवार यांनी ही याचिका दाखल केली होती.

याचिका कत्र्यांचेवतीने अॅड. अनिल किलोर यांनी तर सरकारच्या वतीने अॅड. जोशी, अॅड. कडू यांनी काम पाहिले. विशेष बाब म्हणून माॅडेलस्कूल कायम ठेवा.

उच्च न्यायालयाचे आदेशामुळे बंद झालेल्या माॅडेल स्कूल पुन्हा सुरू होणार आहे, मात्र यात नव्याने प्रवेश दिला जाणार नसून जुन्या विद्यार्थांकरीताच प्रवेश मिळणार आहे. गडचिरोली जिल्हा हा राज्यातील मागास जिल्हा आहे, आदिवासी बहुल आहे, नक्षलग्रस्त भाग आहे यामुळे या भागात दर्जेदार शिक्षणाची गती वाढविणे आवश्यक असून विशेष बाब म्हणून कायम स्वरूपी माॅडेल स्कूल शासनाने सुरू करावे अशी मागणी अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे.

शिक्षणाच्या हक्कासाठी श्रमिक एल्गारची दुसरी याचीका

गडचिरोली जिहयातील बंगाली विद्याथ्र्यांकरिता बंगाली माध्यमातुन शिक्षण दिल्या जात होते परंतू पुस्तके मात्र मराठी माध्यमातील दिल्या जात होते व मराठी माध्यमातील शिक्षक दिल्या जात होते तर बंगाली विद्याथ्र्यांना बंगाली माध्यमातील पुस्तक व बंगाली माध्यमातील शिक्षक द्यावे यासाठी श्रमिक एल्गारने यापुर्वी उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. आणि उच्च न्यायालयाने याची दखल घेत घेवुन राज्य शासनाला बंगाली पुस्तके उपलब्ध करून देण्याचे व बंगाली शि्क्षक देण्याचे आदेश दिले होते. हे येथे उल्लेखनीय. जिल्ह्यात विशेष बाब म्हणून माॅडेल स्कूल कायम ठेवावे या मागणीसाठी अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात पालकांनी मान.

खासदार, अशोक नेते यांचीभेट घेतली. या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोबत बैठक घेण्याचे मान्य केले.

शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. योगिता भांडेकर यांची भेट घेऊन त्यांचकडे हायकोर्टाचे आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. भेटी संदर्भातही चर्चा करण्यात आले. पत्रकार परिषदेला विजय सिद्धावार, विजय कोरेवार, व्यंकट पदा, हरीचंद्र सहारे, रवींद्र पुंगाटे, भागरथा गावडे रा. मोहाली,सीताराम बडोदे रा. धानोरा, नजीर शेख रा.आल्लापल्ली, एच. डी. पठाण रा. गडचिरोली हे उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement