Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Nov 30th, 2017

  जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीची मतमोजणी शांततेत


  नागपूर:
  नागपूर जिल्हा नियोजन समितीवर विविध निर्वाचन क्षेत्रासाठी निवडून द्यायच्या निवडणुकीचे मतमोजणी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली बचनभवन येथे शांततेत पारपडली. नियोजन समितीच्या सदस्यांच्या निवडणूक अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

  नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीतील मतदानाची मतमोजणीनंतर खालीलप्रमाणे मतदार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.
  मोठे नागरी निर्वाचन क्षेत्रामध्ये 1) मोहड विशाखा प्रकाश (2800 मते), 2) आखतकर स्वाती चंद्रकांत (2800 मते), 3) बिहारे स्नेहल सतीश (2756मते), 4) अंसारी जिशान मुमताज मोहम्मद इरफान (2703 मते), मोठे नागरी क्षेत्र (सर्वसामान्य) 1) ग्वालबंशी जगदीश शिवदास (2900 मते), 2) भोयर रविंद्र प्रभाकर (2800 मते) 3) दिकोंडवार हरिष सितारामजी (2800 मते), 4) बोरकर नरेंद्र (बाल्या) गोविंद (2750 मते).

  मोठे शहरी निर्वाचन क्षेत्रामध्ये 1) ॲड बालपांडे संजयकुमार कृष्णराव (3700 मते), 2) गोतमारे शेषराव शंकरराव (3500 मते), 3) हिरणवार सुनिल दुलिचंद (3496 मते), मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र अनुसूचित जाती महिला 1) पाटील निरंजना महेश (54 मते), 2) भगत वंदना भानुदास (54 मते), मोठे नागरी अनुसूचित जमाती महिला 1) नदंनवार यशश्री देवराव (110 मते), लहान नागरी क्षेत्र बीबीसी महिला 1) कळंबे कल्पना रघुनाथ (125 मते), लहान नागरी क्षेत्र महिला सर्वसाधारण 1) भदोरिया विजया लक्ष्मी रणधीरसिंह (134 मते), लहान नागरी सर्वसाधारण 1) पाठक मनोहर नारायण (131 मते), लहान नागरी अनुसूचित जाती 1) बर्वे नरेश कचुरुजी (123 मते), संक्रमणात्मक निर्वाचन क्षेत्र 1) चामटे गुणवंत धनपत (38 मते).

  नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीसाठी यापूर्वी सहा उमेदवाराची अविरोध निवड झाली आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्रीया या नागरी निर्वाचन क्षेत्रातून निवड झाली आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145