
मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी येत्या २१ डिसेंबर रोजीच होणार, असा ठराविक आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने खंडपीठाचा निर्णय योग्य ठरवत याचिका स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. त्यामुळे मतमोजणीची तारीख बदलणार नसून, राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींचा निकाल नियोजित दिवशीच घोषित केला जाणार आहे.
या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले असून, प्रशासन आता २१ डिसेंबरच्या मतमोजणीसाठी तयारीत लागले आहे.
Advertisement









