Published On : Mon, Jul 15th, 2019

पोलीस काकांचे विद्यार्थ्यांना समुपदेशन

बुटीबोरी : समाजातील वाईट प्रवृत्तीवर वचक ठेवण्यासाठी सदैव सतर्क असलेल्या पोलिसांशी ते ज्या नागरिकांसाठी लढताहेत त्यांना याबाबत माहिती व जनजागृती व्हावी या उद्देशाने स्थानिक दत्त विद्या मंदिर च्या वतीने दि.१२ जुलै देवशयनी आषाढी एकादशी चे औचित्य साधून पोलिसांतर्फे विदयार्थ्यांना समुपदेशनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी बुटीबोरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेख यांनी महिलांचे मनोबल खच्चीकरण करण्यासारखे गुन्हे सध्यस्थितीत घडत असून याला आळा बसविण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसी संवाद साधला.त्यांना गुड टच, बॅड टच याविषयी मार्गदर्शन करून गुन्ह्याच्या परिस्थितीची जाणीव करून दिली.

तसेच सध्या जोरात दुचाकी हाकणारी अल्पवयीन,युवा मुले चैनीचे आयुष्य जगण्यासाठी त्यांच्याकडून होणारी पैशांची वारेमाप उधळपट्टी व त्यासाठी त्यांच्याकडून होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन त्यात होणारे अपघात आदी बाबत उपस्थित विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात आले.पोलीस ठाण्यातील कामकाज,तक्रार कशी करायची,सायबर गुन्हे याबाबत जागृत राहून कोणती काळजी घ्यावी,घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना कशी द्यावी याची माहिती देण्यात आली.यावेळी विद्यालयातील ४०० विद्यार्थी उपस्थित होते.

त्यापैकी बऱ्याच विदयार्थ्यांनी पोलिसांशी संवाद साधून आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली.प्रसंगी बुटीबोरी पोलीस ठाण्यातील पो.ह.विनायक सातव, नारायण भोयर,रमेश काकड विद्यालयाच्या मुख्याधिपिका सौ.महंत आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.

– संदीप बलवीर,बुटिबोरी