Published On : Sat, Jan 13th, 2018

नगरसेवक बंटी शेळके यांना बदनाम करण्याचा SNDL चा कुटीलडाव उघडकीस

Advertisement

नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या नावावर कुठलेही विजेचे कनेक्शन व मीटर नसताना SNDL ने उच्चस्तरीय दबावतंत्रामुळे नाहक बदनामी करण्याचा डाव रचला आहे. आर. जे. शेळके यांचे नावाने असलेल्या मीटर मे 2012 मधे 446 यूनिट, जून 574 यूनिट,2013 ऑगस्ट मधे 700 यूनिट, जुलै 14 मधे 564 यूनिट, मे 2015 मधे 610 यूनिट,जून 2015 मधे 521 यूनिट,मे 2016 मधे 920 यूनिट, जून 2016 मधे 790 यूनिट, सप्टेंबर 2016 मधे 527 यूनिट, नवंबर 2016 मधे 1127 यूनिट, मे 2017 मधे 613 यूनिट, जून 2017 मधे 575 यूनिट, जुलै 2017 मधे 596 यूनिट, ऑगस्ट 2017 मधे 450 यूनिट असे यूनिट चे देयक पाठविले. तेव्हा SNDL कडे कित्येक वेळा लेखी तक्रार केली.पण दखल घेतल्या गेली नाही. SNDL चे फॉलटी मीटर असताना भरमसाठ बिल पाठवत होते 2012 मधे व 2017 जीमधे तेवढेच विजेचे उपकरण असताना यूनिट मधे तफावत कशी अशी विचारणा ही करण्यात आली.

श्री बंटी शेळके हे जनचेतना यात्रा रैलीला गेले असताना त्यांच्या गैर हजेरीत वीज कनेक्शन कापली.तेव्हा SNDL ने बंटी शेळके व बाबा शेळके यांना बदनाम केले. बाबा शेळके यांच्या नावाने ही वीज कनेक्शन नाही त्यांना ही यात गोवन्यात आले आर.जे.शेळके ग्राहक असताना बंटी शेळके यांना कोणाच्या तरी दबावामुळे बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले त्याचे कारण सतत आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नासाठी लढणारे व सत्ता पक्षाचे वाभाडे काढणारे बंटी शेळके यांचा कमजोर दुवा सापडत नसल्यामुळे अशा तऱ्हेने कट रचत आहे.SNDL ने चालविलेल्या मनमानी च्या विरोधात असंख्य आंदोलन जनतेच्या माध्यमातून केले त्याच्या हा वचपा घेत आहे वीज कनेक्शन कापल्यावरही मागील रीडिंग 10018 व चालू रीडिंग 10018 असे दाखविले व 390 यूनिट विज वापरल्याचे देयक पाठविले.आज नगरसेवक बंटी शेळके यांच्या कड़े SNDL चे 100 बाउंसर व 60 पुलिस वाले येऊन धडकले म्हणाले की आपले मीटर काढयचे आहे तेव्हा नगरसेवक बंटी शेळके यांनी ओळखपत्र मागितले तेव्हा SNDL वाले म्हणाले बंटी शेळके च्या नावाने मीटर नाही बिल नाही तुम्ही मधे पडु नका.

तेव्हा बंटी शेळके यांनी SNDL च्या कर्मचाऱ्याना म्हटले माझी बदनामी केली त्याचे काय ? व बिना ओळखपत्र नसलेल्या बाउंसरवर गुन्हा दाखल करा असे पोलिसांना सांगितले गुन्हा तर दाखल केला नाही उलट पोलिस SNDL चे समर्थन करीत होते काही वेळा नंतर धर्मेंद्र श्रीवास्तव हे SNDL चे अधिकारी आले व म्हणाले तुलसीबाग कार्यालयात तेथे गेले असता सिस्टम अपडेट नव्हती मग छापरु नगर येथे गेले.तेथे त्यांनी 90000 रुपये भरल्यावर लिहून दिले.की तुमचे मीटर तपासणीसाठी लैब मधे पाठवितो व दोषी आढळल्यास विजेच्या बिलाची फेररचना करू असे म्हटले आज 90000 भरल्याबरोबर SNDL नी शेळके कडील वीज पुरवठा सुरु केला.